ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोफत शिबीर: अग्रवाल महिला संमेलन व महिला मंडळाचे आयोजन ! कठीण परिस्थितीत सेवाकार्य उभारी देणारे : प.पू मनोज महाराज गौड

April 8, 202113:22 PM 60 0 0

जालना ( प्रतिनिधी) : कोरोना महामारी मुळे मानवी जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. काळ कठीण असून अशा कठीण परिस्थितीतही होत असलेले सेवाकार्य मनुष्य जातीला नवी उभारी देणारे आहे. असे प्रतिपादन प.पू.मनोज महाराज गौड यांनी आज येथे बोलताना केले.

अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन महाराष्ट्र संचलित, अग्रवाल महिला संमेलन आणि जालना जिल्हा अग्रवाल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ बुधवारी (ता.०७) मधुर बँक्वेट हॉल येथे प.पू.मनोज महाराज गौड यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी पोलीस अधिकारी भताने , अग्रवाल समाजातील अग्रगण्य कार्यकर्ते पुरुषोत्तम जयपुरिया, अरुण मित्तल, महिला संमेलनाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा स्मिता मित्तल, सचिव डॉ. अनिता तवरावाला, सहसचिव सोनल मित्तल ,अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा
देवीदान ,सचिव सीमा पंच, सोनाली जयपुरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी अडीचशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
प. पू. मनोज महाराज गौड यांनी कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी लस हे रामबाण उपाय असून प्रत्येकाने आपले रक्षण करण्यासाठी सदर लस घ्यावी. असे आवाहन करत अग्रवाल महिला मंडळाच्या कार्यास सदिच्छा दिल्या.

अग्रवाल महिला संमेलनाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा स्मिता मित्तल यांनी कोरोना संसर्गापासून दूर पळायचे नाही तर कोरोनाला आपल्यापासून पळवायचे आहे.असे सांगून वेळेचे महत्त्व लक्षात घेऊनच नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पहिल्या उपक्रमास पुरूषोत्तम जयपुरिया यांनी सुसज्ज व अत्याधुनिक बँक्वेट सभागृह उपलब्ध करून दिल्याने सदर शिबीर सुरू राहील. असे स्मिता मित्तल यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. अनिता तवरावाला, यांनी केले तर सीमा पंच यांनी आभार मानले .यावेळी रचना पित्ती ,आरती पित्ती, राजेश्वरी अग्रवाल, सुनंदा तंबाखूवाला, रेखा अग्रवाल, अनिता अग्रवाल यांच्यासह अग्रवाल महिला संमेलन व महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य तसेच लस घेणाऱ्या नागरिकांची उपस्थित होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *