उरण (संगिता पवार) कोरोना पासून नागरिकांचा बचाव व्हावा .त्यांना व त्यांच्या कुटुबियांना त्रास होऊ नये .नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे .खाजगी हॉस्पिटल लसीकरण साठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात .गरीब -गरजू नागरिकांना लसीकरण मोफत मिळावे या साठी उरण चे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून उरण तालुक्यातील मोरा ( उरण ) इंग्लिश मेडियम स्कूल मोरा येथे मोफत कोरोना १९ वॅक्सिनेशन सोमवार ( दि. २० ) रोजी पासून सुरु करण्यात आली आहे .पहिला डोस देण्यांत आला .
उद्घाटन प्रसंगी उरण उपनगराध्यक्ष जयविन कोळी , हितेश शाह , माजी नगरसेविका नंदा माजगावकर ,माजी नगरसेवक राजेश कोळी ,विनायक कोळी , रोहित कोळी ,अप्पू कोळी ,आदी उपस्थित होते . कोरोना १९ वॅक्सिनेशन सोमवार ( दि. २० ) व गुरुवार (दि .२३ ) रोजी सकाळी ९ वाजल्या पासून देण्यात येईल. असे आयोजक यांच्या काढून सांगण्यात आले आहे .
Leave a Reply