ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरपीआय आठवले गटाच्या वतीने मोफत कोरोना लसिकरण केंद्र सुरु; कोरोना लसिकरण केंद्राचे गणेश रत्नपारखे यांच्या हस्ते उद्घाटन

September 16, 202113:22 PM 57 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील नुतन वसाहत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आरपीआय आठवले गटच्या वतीने नुकतेच कोरोना लसिकरण केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन माजी नगरसेवक तथा आरपीआय चे जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे यांच्या हस्ते करण्यात आले.


नुतन वसाहत भागातील नागरीकांसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले)च्या वतीने अमोल रत्नपारखे यांनी हे केंद्र सुरु केले असून या केंद्रावर 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी महेंद्र रत्नपारखे, अमोल रत्नपारखे, दिपक वैद्य, रत्नाकर चाटे, सलीम खान, आकाश रत्नपारखे, शुभम रत्नपारखे, राहुल तायडे, चंद्रकांत जाधव, अशोक लाहोरे, उज्वला झोटे यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *