ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जेएनपीटीची मोफत कोविड -19 लसीकरण मोहीम सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा येथे ट्रक चालकांचे होणार मोफत लसीकरण

October 27, 202113:52 PM 59 0 0

उरण(संगिता पवार) : 26 ऑक्टोबर 2021: स्वतंत्र भारताची 75 वर्षे अर्थात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी व भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या स्मृति जगविण्यासाठी भारत सरकार द्वारा ‘आझादी का अमृत महोत्सवा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी उपाध्यक्ष श्री उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. यांच्या उपस्थितीत जेएनपीटी बंदरा लगत असलेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) येथे ड्राइव्हर्स ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ आणि ‘एनरिक लाइव्ह्स फाउंडेशन’ च्या सहकार्याने कंटेनर ट्रक चालकांसाठी मोफत कोविड -19 लसीकरण मोहीमेचा शुभारंभ केला.


मोफत कोविड -19 लसीकरण मोहिमे विषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “ट्रक चालक हे सागरी पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग आहेत. कोविड -19 साथीच्या काळात जेएनपीटीने कोविड-19 चा सामना करण्यासाठी आघाडीवर राहून अनेक उपाययोजना केल्या व देशातील पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाला पाठिंबा देऊन एक सक्षम आयात-निर्यात व्यापार सुनिश्चित केला. त्या अंतर्गत ट्रक चालकांसाठी सुरू केलेली ही मोफत लसीकरण मोहीम एक महत्वाचा उपक्रम आहे. याशिवाय आमचे सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) हे आधुनिक सुविधांनी युक्त असून ट्रक चालकांसाठी समर्पित आहे. याठिकाणी ट्रक चालकांसाठी शयनगृह कँटीन, स्वच्छतागृह, वाहनांची दुरुस्ती व देखभाल इत्यादि सुविधा उपलब्ध आहेत.”
या वर्षाच्या सुरुवातीला आमच्या जेएनपीटी रुग्णालयाने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला चालना मिळाली आहे. या लसीकरण मोहिमेद्वारे आम्ही जवळपास 20,000 हून अधिक लोकांना कोविड -19 लस दिल्या आहेत. शिवाय जेएनपीटीच्या समर्पित कोविड -19 आरोग्य केंद्राने (डीसीएचसी) “शून्य कोविड रुग्ण” नोंदवून एक नवीन टप्पा गाठला आहे. शिवाय, आम्ही कोविड -19 च्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण वैद्यकीय सामग्रीच्या हाताळणीस सर्वोच्च प्राधान्य देत आहोत.
जेएनपीटी ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून, विविध उपक्रमांमध्ये लोकांना सहभागी करून घेत व भारताच्या परिवर्तनावर जोर देत या देशव्यापी मोहिमेत सक्रियपणे योगदान देत आहे. या अनुषंगाने, जेएनपीटीने पुढच्या महिन्यात अनेक उपक्रम, मोहिमा आणि कार्यक्रम राबवण्याची योजना आखली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *