ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओएनजीसी उरण प्लान्ट तर्फे मोफत कोविड वॅक्सीन कॅम्प; ६०० हून अधिक नागरिकांनी घेतला फायदा

August 5, 202118:27 PM 12 0 0

उरण (संगिता पवार ) नागाव व म्हातवली प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायती मधील ग्रामस्थांना ओएनजीसी उरण प्लान्ट च्या वतीने सीएसआर निधीतून मोफत व पालवी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून कोविड वॅक्सीन कॅम्प मंगळवार ( दि. ३ )ऑगस्ट २१ रोजी सोमवंशी क्षत्रिय पाठारे हॉल येथे घेण्यात आले ,. नागाव व म्हातवली गावातील सुमारे ६०० हून अधिक ग्रामस्थांनी संधीचा फायदा घेतला . पहिला कॅम्प २३ जुलै रोजी घेण्यात आला होता त्यात ५०६ नागरिकांनी कोविड वॅक्सीन घेतली .होती .

पालवी हॉस्पिटल उरण चे लसीकरण केंद्र प्रमुख डॉ .सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले त्यात सुमारे ४ डॉक्टर, ५ नर्सेस ,व ६ डाटा ऑपरेटर आदी सहभागी झाले होते त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले .

या प्रसंगी ओएनजीसी चे प्लान्ट मॅनेजर इंद्रजीत गुहा ,एच आर प्रमुख विल्लम केरकट्टा ,सीएसआर चे कॉडीनेटर गौरव पतंगे ,नागाव ग्रामपंचायत सरपंच चेतन काशिनाथ गायकवाड, ,उपसरपंच भूपेन घरत ,,म्हातवली ग्रामपंचायत सरपंच रंजना चारुदत्त पाटील ,उपसरपंच पल्लवी पराग म्हात्रे , ओएनजीसी अधिकारी ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सदस्या ,कर्मचारी ,आशा वर्कर , ग्रामस्त आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *