ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जन्मदिनाचं औचित्य साधत पुनाडे आदिवासी वाडीवरील बांधवांनां केलं मोफत ई-श्रमकार्ड आणि रिअल फ्रेश फ्रुटज्यूस आणि ग्लुकॉनडीचं वाटप

June 4, 202215:14 PM 25 0 0

असं म्हणतात की मनुष्याला आनंदी राहण्याचे एक ना अनेक मार्ग असतात पण।जो मनुष्य दुसऱ्याला आनंदी करण्याकरिता आपली।दुःख बाजूला सारून दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानतो ह्यालाच तर माणसातली माणुसकी असं म्हणतात आणि ह्याच माणुसकीच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज्यातील गरीब- गरजूवंता करिता आपलं योगदान देणारी संस्था म्हणजेच  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष  सन्माननीय प्रितमदादा म्हात्रे साहेब यांच्या  संकल्पनारुपी औदार्यातून  आणि  केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक सन्माननीय  राजू मुंबईकर साहेब यांच्या सहकार्यातून सोबतच श्री समर्थकृपा सखी स्वयंसाहाय्यता संस्था उरणच्या संस्थापक अध्यक्षा सन्माननीय सौ.संगिताताई ढेरे यांच्या दातृत्वातुन आज एक अनोखं कार्य साकारलं गेलं ते उरण येथील पुनाडे या आदिवासी वाडीवर आणि  औचित्य होतं ते  तिघां युवकांच्या जन्मदिनाचं  जे  ह्या समाज्यात जगत असतांना आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात नेहमी आपल्या परीने जे जमेल त्या समाजपयोगी कार्यात आपला सहभाग नोंदवीत असतात.

ज्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत आजचा हे प्रेरणादायी कार्य साकारलं त्यातलं पाहिलं नावं  आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका अध्यक्ष अनिल घरत (पिरकोन ), गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेचे मा.अध्यक्ष.माधव म्हात्रे (सारडे ) आणि केअर ऑफ़ नेचर  सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी विलास ठाकूर (केळवणे ) या तीन व्यक्तिमत्वांच्यां जन्मदिनाचं औचित्य साधत  पुनाडे येथील आदिवासी वाडीवर मोफत ई-श्रमकार्ड आणि  रिअल फ्रेश फ्रुट ज्यूस व ग्लुकॉनडी एनर्जी ड्रिंक्सचं वाटप करण्यात आले ते  सामाजिक दायित्व जपत ज्यांच्या माध्यमातून अज पर्यंत अनेक गरीब गार्जुवंतांना मदतीचा हात पुढे करत त्यांना सवरणारी संस्था अर्थात  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल आणि त्या संस्थेचे अध्यक्ष  माननीय श्री.प्रितमदादा म्हात्रे साहेब आणि  केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था या संस्थेचे संस्थापक  माननीय  राजू मुंबईकर साहेब यांच्या  औदार्यातून आज पर्यंत तब्बल सहा हजारच्या वर  मोफत ई-श्रमकार्ड बनवून देण्यात आली आहेत त्या ई- श्रमकार्डचं वाटप करण्यात आले. त्याच बरोबर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्याचं महत्वाचं योगदान आहे अश्या … श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ.संगिताताई ढेरे यांच्या दातृत्वातुन आज पर्यंत ह्या कोरोना काळात तब्बल तेरा लाख रुपये किंमतीच्या वर असे डाबर ह्या नामांकित कंपनीचे प्रॉडक्ट  रिअल फ्रेश फ्रुट ज्यूस, शाम्पू, नारळपाणी,तेल,कोरोना किट , आणि इतर समानाचं वाटप करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून रिअल फ्रेश फ्रुट ज्यूसचं वाटप करण्यात आले.
ह्या कार्यक्रमा करिता खास उपस्थिती दर्शविली ती  रायगड भूषण सन्माननीय राजू मुंबईकर साहेब डी.वाय.पाटील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी नेरुळ कॉलेजच्या सन्माननीय नितीन चव्हाण सन्माननीय मानसी जावळे आणि कॉलेजचे विद्यार्थीवर्ग सोबतच  गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेचे अध्यक्ष नवनीत पाटील उपाध्यक्ष हिराचंद म्हात्रे कार्याध्यक्ष देविदास पाटील, क्रांती म्हात्रे, समाधान पाटील, रचित म्हात्रे, सोनिक ठाकूर आणि पुनाडे आदिवासी वाडीवरील जेष्ठ नागरिक बुवा व सर्व आदिवासी बांधव लहान चिमुकले बाळ-गोपाळ यांच्या उपस्थित मोफत ई-श्रमकार्ड वाटप व रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसचं वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *