ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मधुमेही रोगीसाठी मोफत आरोग्य शिबीर

October 24, 202112:50 PM 51 0 0

उरण (संगीता ढेरे) : हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरण यांच्या माध्यमातून द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशन यांच्या सहकार्याने उरण मधील मस्जिद मोहल्ला, उरण पोलीस स्टेशन जवळ, उरण शहर येथे मधुमेही (डायबेटीस ) रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरा अंतर्गत मधुमेही (डायबेटीस )रुग्णांचे HBA1C,लिव्हर प्रोफाइल, एलक्ट्रॉलयटीस, युरीनालायसिस, सी क्रीटीव्ह, इन्फेकशन पॅनल (3 H,VDRL, MALARIA )आदी तपासण्या मोफत करण्यात आले.

खास मधुमेही रोगांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.100 हुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी हयातूल इस्लाम गरीब नवाज चॅरिटेबल ट्रस्ट उरणचे हाफिज फहद, हाफिज अर्शद, शानू मुकादम, नईम करवेकर, इरफान शेख, गुलजार भाटकर तर द ब्रदरहूड मेडिकल ऐड ऍण्ड वेलफेअर फॉउंडेशनचे इम्रान गुजराथी, अब्दुल पठाण, हरून गिरनारी आदी पदाधिकारी सदस्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र मढवी,सरचिटणीस संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते आयाझ फकिह यांनी भेट दिली. सदर आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *