नांदेड – शहरातील तरोडा शिवरोडस्थित सप्तगिरी काॅलनीत मार्शल आर्ट कुंग फू कराटे अकादमीच्या वतीने मोफत शिकवणी वर्गास प्रारंभ करण्यात आला. या उद्घाटकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्चरल असोसिएशनचे मारोती धुतुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्शल आर्ट कुंग फु कराटे अकादमीचे गंगाधर वडने, अॅड. ज्योती चंदनशिवे, कृष्णा गजभारे, नितीन एंगडे, माया नांदेडकर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे अनुरत्न वाघमारे, कवी नागोराव डोंगरे, साहित्यिक गंगाधर ढवळे, मारोती कदम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सम्राट हटकर, यशवंत गिरबिडे यांची उपस्थिती होती.
सप्तगिरी काॅलनीत बुद्ध विहार परिसरातील शाळकरी मुलांना व मुलींना स्वसरंक्षण करता यावे यासाठी मोफत प्रशिक्षण दिल्या जात आहे. लाॅकडाऊननंतर चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच महिला व लहान मुलांवरही हल्ले होत आहेत. मुलींनाही आपले संरक्षण स्वत:लाच करता यावे, यासाठी अकादमीच्या वतीने शहरात देगाव चाळ, पंचशील नगर, भीमघाट, मिल परिसर यांसह ठिकठिकाणी या वर्गाचा शुभारंभ करण्यात येत आहे. आरोग्याच्या सुदृढतेच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. त्यासाठी गंगाधर ढवळे, गंगाधर वडने, कृष्णा गजभारे, नितीन एंगडे हे प्रयत्नशील आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त मुला मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply