ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोफत विधी सेवा सहाय्य प्रत्येक बंद्याचा मुलभूत अधिकार – रेणुप्रसाद पारवेकर

February 11, 202215:04 PM 35 0 0

जालना :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , जालना कडुन जिल्हा कारागृहातील बंद्यांना मोफत विधी सेवा सहाय व समुपदेशनाकरीता पॅनल विधीज्ञांची नेमणुक करण्यात येते . जिल्हा कारागृहात बंद्याना विधी सेवा व सल्ला देण्याकरीता एकुण 9 पॅनल विधीज्ञांची नेमणुक करण्यात आलेली आहे. अशा पॅनल विधीज्ञांना कोणत्याही प्रकारची फीस, खर्च देण्याची आवश्यकता नाही. कारागृहात बंदी असलेल्या बांधवांचा खटला चालविण्याकरीता नियुक्त केलेल्या पॅनल विधीज्ञांना अशा खटल्यात झेरॉक्स, टंकलेखन व इतर खर्च शासनामार्फत नियमाप्रमाणे देण्यात येतो. प्रत्येक बंदी मोफत विधी सेवा सहाय मिळण्यासाठी पात्र आहे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणुप्रसाद पारवेकर यांनी केले .
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह वर्ग -1 जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन नुकतेच जिल्हा कारागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक श्री.मोमीन, एच.डी. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती .
रेणुप्रसाद पारवेकर म्हणाले की , नियमाप्रमाणे शासनामार्फत खर्च देण्यात येत असल्याने बंदी अथवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही संबंधीताने विधीज्ञ यांना फीस, खर्च देण्याची आवश्यकता नाही. बंदी व त्याच्या नातेवाईकांना कुठलीही विधी सेवा सहाय सेवा पाहिजे असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे दुरध्वनी क्र.02482-223625 आणि भ्रमणध्वनी क्र. 8591903621 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री पारवेकर यांनी यावेळी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *