ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खारघर मधील अन्नपूर्णा बचत गटाचे पोस्टामार्फत मोफत शिबिर

March 17, 202212:41 PM 43 0 0

पनवेल ( देवयानी कुलकर्णी) : खारघर दि. 1५ मार्च रोजी वास्तू विहार येथील के एच वन सोसायटीमध्ये अन्नपूर्णा बचत गट व पोस्ट खाते यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबीर भरवण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून लहान मुलांचे आधार कार्ड बनविणे, मोठ्या माणसांचे आधार कार्ड लिंक करणे व पोस्टाची तीन वर्षाची व पाच वर्षाची आर.डी योजना, तसेच सुकन्या योजना याबाबत जनजागृती करण्यात आली. याबाबत लहान मुलांनाही आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी स्वतः कसे पैसे जमा करावे, व स्वतःच स्वतःची आर.डी कशी सुरु करावी याची पूर्ण माहिती देण्यात आली. प्रचंड संख्येने यावेळी महिला व लहान मुले या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *