ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फुटबॉल ह्या खेळाचे निःशुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू

May 14, 202212:41 PM 26 0 0

उरण (संगिता पवार ) : गुरुवार (दि.१२ )रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग रायगड व सेव्हन स्टार फुटबॉल अकॅडेमी उरण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने उरण नगरपरिषद शाळेचे ग्राउंड येथे फुटबॉल ह्या खेळाचे निःशुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे.

कार्यक्रमा च उदघाटन प्रमुख पाहुणे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसियशन उरण चे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री महादेव घरत , नगरसेवक राजू ठाकूर , माजी सभापती , अधिकारी रवींद्र नाईक ह्यांचा मार्गदर्शना खाली हे शिबिर आयोजित करण्यात आले, सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमी चे संस्थापक / अध्यक्ष प्रवीण तोगरे सर व उपाध्यक्षा सौ नंदिनी ताई तोगरे ह्यांचा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ह्या फुटबॉल खेळाचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचे प्रमुख कारण मुलांचे सर्वांगीण विकास करणे, मुलांना खेळाचे आवड निर्माण करणे व महत्व पटवून देणे तर आहेच, त्याच बरोबर त्यांचे कौशल्य वाढवणे, त्यांचा उत्तम रित्या मानसिक व शारीरिक विकास करणे हे आहे. प्रथम दिवशी शिबीर ला एकूण 35 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *