ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खोपोलीतील रहाटवडे परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत; ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा

August 19, 202213:11 PM 15 0 0

खोपोली  (कु. अदिती पवार) : शहरातील गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वासरंग, रहाटवडे , विहारी, झेनिथ ठाकुरवाडी , प्रकाशनगर गावातील औद्योगीक फिडरवरील विद्युत वारंवार खंडीत होत असून,औद्योगिक फिडरवरती तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले जात आहे. अनेक वेळा तांत्रिक बिघाडामुळे दररोज पाच ते सहा तास नागरिकांना अंधारात रहावे लागत असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आगामी काळात सण उत्सव असल्याने घरगुती विज पुरवठा खंडीत होवू नये यासाठी युध्दपातळीवर स्वरूपी उपाययोजना करण्याचे निवेदन विद्युत वितरण कंपनी खोपोलीचे उपकार्यकारी अभियंता सतिष गद्री यांचेकडे दिला आहे.तर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाहीत आमरण उपोषण सारख्या हत्याराचा अवलंब करण्यास भाग पडू नका असा इशारा वरिल गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
गावांमधे गेले आठ ते दहा दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्यावर औद्योगिक फिडरवरती तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून जबाबदारी झटकत असल्यामुळे पावसाळ्यात पाच ते सहा तास नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे.

नागरिकांनी अखेर अक्रमक पवित्रा घेत बुधवार दि.१७ आँगस्ट रोजी खोपोलीचे उपकार्यकारी अभियंता सतिष गद्री यांची भेट रहाटवडे गावातील ग्रामस्थ शिष्टमंडळ दिलीप पवार, गिता मोहिते,अशा लोहार, सोमनाथ कुंभारे, तेजेस दळवी,कविता कदम,अशा पडघमकर यांनी घेवू्न विद्युत पुरवठा बंद बाबत कैफियत मांडळी असता उपकार्यकारी अभियंता सतिष गद्री यांनी म्हणने ऐकून घेत रहाटवडे गावातील विजेच्या समस्या आठ दिवसात सोडविण्याचे आदेश कनिष्ठ अभियंता मोहिते यांना दिले. तसेच केंद्र शासनाच्या विज योजने अंतर्गत भुमिगत विज वाहिन्या जोडणीचे काम पावसाळ्यानंतर हती घेण्यात येईल.त्यानंतर शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल असेही गद्री म्हणाले आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *