ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मैत्र मांदियाळीने सामाजिक बांधिलकी जोपासली : ओमप्रकाश चितळकर; अहिल्यादेवी होळकर व्याख्यान माले तर्फे सत्कार

June 2, 202123:51 PM 5 0 0

जालना ( प्रतिनिधी) : लोकसहभागातून अनाथ तसेच गोर-गरीब कुटुंबातील गुणवंत मुले-मुली यांच्या शिक्षणाची व्यवस्था, सुंदर व हरित जालना शहरासाठी वृक्ष लागवडी करिता प्रोत्साहन देत अल्पदरात रोपे उपलब्ध करून देणे, अशा विविध उपक्रमांतून मैत्र मांदियाळीने सामाजिक बांधिलकी जोपासली असून सत्पात्री मदत कशी करावी याचा वस्तुपाठ उभा केला आहे .असे गौरवोद्गार अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश चितळकर यांनी काढले.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

समाजकार्यात अग्रभागी असलेल्या मैत्र मांदियाळी च्या सदस्यांचा व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी चितळकर बोलत होते. व्याख्यानमालेचे सचिव बाबासाहेब होळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब आबुज, शशीकांत बामणे ,प्रा.कपिल दहेकर, दीपक दहेकर, कैलास कोळेकर यांची उपस्थिती होती.
चितळकर पुढे म्हणाले, वाढदिवस अथवा मांगलिक कार्य प्रसंगी वायफळ खर्च न करता, जीवनाचे सार्थक व्हावे याकरिता गरजवंत व दाते यांच्यात योग्य समन्वय साधला असून मैञ मांदियाळी च्या उपक्रमास आपल्या परीने सहकार्य राहील . अशी ग्वाही देखील ओमप्रकाश चितळकर यांनी यावेळी दिली.
अजय किंगरे यांनी सुरु असलेल्या उपक्रमांविषयी माहिती देऊन हरित शहरासाठी कोया संकलनातून सावली देणारी रोपे उपलब्ध करून दिली जात असून नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे. असे आवाहन किंगरे यांनी केले.
यावेळी ज्ञानेश्वर सातपुते, सुनील शेळके, कैलास शिंदे, सतीश ढगे ,अनिल कुलकर्णी, निवृत्ती रुद्राक्ष ,किशोर मावकर, संतोष रेगुडे, तुषार साळुंखे आदी सदस्यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *