मैत्रीचा दिवस नसतो एक
मात्र ती असते लाखात एक
मैत्री म्हणजे एक विचार
एकमेकांना भक्कम आधार
सुखदुःखात सावरायला येती
तीच खरी मैत्रिची नाती
मैत्री म्हणजे अनमोल झरा
एकत्रित येऊन करतो साजरा
मैत्री म्हणजे अपेक्षा कमी
परंतु आनंदाची असते हमी
मैत्री असते फुलासारखी टवटवीत
तिच्यामुळेच जीवन होते सुगंधित
मैत्रीची वीण कायम ठेवीत
मिरविती हक्काची ती प्रित
मैत्री प्रत्येकाच्या असावी जीवनी
तिच्यामुळेच प्रेरणा मिळते मनी
– सौ मंगला परेश दोरीक
18 प्रियदर्शनी काॅलनी
शहादा रोड, निमझरी
नाका, शिरपूर जि धुळे
Leave a Reply