ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संस्कृतीतून विकृतीकडे

April 7, 202215:41 PM 51 0 0

भारत देश ओळखला जातो तो भारतातील विविध राज्यातील भाषा व संस्कृतीमुळे. विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहाने आपण साजरे करतो परंतु या प्रत्येकामध्ये पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण मोठ्या प्रमाणात दिसून येते. या उत्सवांमध्ये डीजे लावणें, नाचणे या बरोबरच वैयक्तिक कार्यक्रमात शुभेच्छा देण्यातही अनेक अपप्रकार बघायला मिळतात. यात सध्या प्रामुख्याने सर्वत्र दिसणारा प्रकार म्हणजे वाढदिवसाला आणलेला केक ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या तोंडाला लावणे. विशेष म्हणजे ही वाढती विकृती तरुणाईत तर आहेच परंतू ज्येष्ठांमध्येही काही प्रमाणात दिसून येते. याचा वापर जाहिरातींमध्येही झालेला दिसून येतो. विकृतीने साजरा होणारा हा आनंद प्राणघातक ठरण्याची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातीलच एक घटना ज्यात मित्रांनी रात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर बोलावले व तोंडाला केक लावला, तो केक त्याच्या तोंडावर दाबून धरलयामुळे त्या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा मृत्यू यापेक्षा वाईट गोष्ट कोणती? तसेच आता वाढदिवसाला रात्री बारा वाजता शुभेच्छा देऊन रात्रभर वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात वाढत आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतांना अपशब्द बोलले जातात, लहान वयाची मुले व मद्याच्या पार्टया इ. गोष्टी सर्रास होताना दिसून येतात. खरे तर वाढदिवस म्हणजे आनंदाचा, व्यक्तीला शुभेच्छा देण्याचा, तिचे अभिष्टचिंतन करण्याचा दिवस. हिंदू संस्कृतीनुसार औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. परंतु आज वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या या चांगल्या कृतीची जागा अशा भयावह विकृतीने घेतली आहे. याविषयी समाजात जागृकता निर्माण न केल्यास यापेक्षाही भयानक गोष्टीला सामोरे जावे लागू शकते.

डॉ. प्रणिता महाजन
संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *