ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय पोषण अभियानात राजे संघर्ष प्रतिष्ठानचा मौलिक सहभाग, साठ बालकांना पौष्टीक आहाराचे वाटप

September 27, 202115:18 PM 75 0 0

कराड-पाटण प्रतिनिधी,तळमावले, ता. : येथील राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेश पाटणकर यांनी हाक तुमची साथ आमची या संस्थेच्या ब्रीद वाक्य सार्थ ठरवत कमी वजनाच्या बालकांचे पालकत्व स्वीकारन राष्ट्रीय पोषण आहार अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काळगाव व तळमावले विभागात राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत १ सप्टेंबर पासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण व बीट तळमावले, काळगाव यांच्यामार्फत तळमावले व कुंभारगाव भागातील एकुण ६० कमी वजनाच्या बालकांची डाँक्टर दंडवते यांचेकडून आरोग्यतपासणी करणेत आली.या बालकांना लागणारा औषधोपचार ,पौष्टिक पुरक आहार राजे संघर्ष प्रतिष्ठान तळमावले यांचेमार्फत देणेत आला.

कुपोषण मुक्तीसाठी पाटणकर यांनी मुलांचे पालकत्व स्वीकारले..या राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, पंचायत समिती उपसभापती प्रताप देसाई, राजाभाऊ काळे, रमेश मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय विभुते व संगीता पुजारी, डॉ.गोंजारी, वैशाली गुरव, शीतल गुरव, धनाजी बोर्गे, कुंभारगावच्या सरपंच सारिका पाटणकर, करपेवाडी चे सरपंच रमेश नावडकर, नानासाहेब काजारी, सचिन सावंत, माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा पाटील, अनिल डाकवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सत्यजित पाटणकर म्हणाले की, देशाची भावी पिढी सक्षम करण्याचे काम अंगणवाडी विभाग करीत आहे. अंगणवाडी विभागातर्फे राबवण्यात येणारे असे उपक्रम म्हणजे एक प्रकारची देशसेवाच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सारंग पाटील यांनी अंगणवाडी विभागाने राबवलेले महिला सक्षमीकरण, सुदृढ बालक अभियान असे राबवलेले उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात योगेश पाटणकर यांनी दाखवलेले दातृत्व निश्चितच इतरांसाठी आदर्श ठरणार आहे. कमी वजनाच्या बालकांसाठी सहा महिन्यांचा आहार व औषधे उपलब्ध करून देणाऱ्या योगेश पाटणकर यांचे अभिमानास्पद कार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. सामजिक जाणीव म्हणून राजे संघर्ष प्रतिष्ठान नेहमीच कार्य करत असते काळगाव व तळमावले बीट मधील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी भविष्यातही असे वेगवेगळे उपक्रम राबवावेत. अशा विविध प्रकारच्या उपक्रमांना आमची मदत राहील असे आश्वासन योगेश पाटणकर यांनी दिले. या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पालकवर्गाला पर्यवेक्षिका अरुंधती गरुड, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय विभुते, अंगणवाडी सेविका वैशाली मोरे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कदम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तळमावले बीटच्या पर्यवेक्षिका कुसुम दीक्षित यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *