ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मौजपुरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीः आ. कैलास गोरंट्याल

August 10, 202113:17 PM 26 0 0

जालना (प्रतिनिधी) ः विधानसभा निवडणुकीत मौजपुरी येथील ग्रामस्थांनी आपल्या पारड्यात भरभरुन मतदान टाकले आहे. त्यामुळे या गावाच्या सर्वागिन विकासासाठी आपल नेहमीज प्राधान्य दिले असून भविष्यात देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी मौजपुरी येथे बोलतांना दिली. जालना विधानसभा मतदार संघातील मौजपुरी येथे 25/15 योजने अंतर्गत 10 लक्ष रुपये आणि दलित वस्ती योजने अंतर्गत 16 लक्ष रुपये अशा एकुन 26 लक्ष रुपये खर्चुन करण्यात येणार असलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जि.प. सदस्य राम सावंत, माजी सरपंच संजय शेजूळ, जालना तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव,नारायण शिंदे, अरूण घडलिंग, दत्ता घुले, दत्ता शिंदे, सोपान तिरूखे, रमेश जोशी, अंजेभाऊ चव्हाण, अविनाश मोरे, भागवत राऊत, राजू महाडिक, नारायण डोंगरे, बद्री बसाडे,विष्णू गायकवाड,सुधाकर ढोकळे, राम शेजूळ, अरूण काळे, शेखलाल भाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आ. गोरंट्याल पुढे म्हणाले की, राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन मतदार संघात विकासाची कामे करण्यासाठी आपण कटीबध्द असून मौजपुरी येथील मतदारांनी निवडणुकीत आपल्यावर जो विश्‍वास टाकला. त्या विश्‍वासाला तडा न देता या गावाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे आ.गोरंट्याल यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील ग्रामस्थांच्या वतीने आ. कैलास गोरंट्याल यांच्या शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *