(नांदेड) : दिनांक 24 जुलै शनिवार रोजी नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ताई ठाकूर यांनी किनवट तालुक्यातील निसर्ग पर्यटन संकुल असलेल्या सहस्त्रकुंड येथील नर्सरीत आपल्या कुटुंबासह भेट देऊन पाहणी केली. सदरील नर्सरीत वनविभागाने अतिशय उत्तम दर्जाचे बनवले असल्याने व या भागातील पर्यटनास चालना देण्यासाठी व वृद्ध लोकांना एक विसावा निर्माण केला असल्याची त्यांनी कबुली दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर यांचा हा खाजगी दौरा असल्याने त्यांनी कुठल्याही देवस्थानाला भेट दिली नाही विशेषता एक पर्यटक म्हणून सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी त्यांनी कुटुंबासह मनमोहक दृशाचा आनंद लुटला.
या पर्यटनस्थळावर होणारी गर्दी पाहून त्यांनी जमलेल्या पर्यटकांना कोरूना च्या तिसऱ्या लाटेचा संभव असून सोशल डिस्टंसिंग व सर्वांनी मास्क वापरावे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाला हरवावे असे यावेळी पर्यटकांना आव्हान केले व या ठिकाणी जास्त गर्दी करण्यात येऊ नये अशा स्वरूपाच्या यावेळी त्यांनी कडक स्वरूपाच्या सूचना ही दिल्या.वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या निसर्गरम्य पर्यटन संकुल हे जिल्ह्यात नावारूपाला येईल व पर्यटकांना विरंगुळा म्हणून या ठिकाणी प्रसन्नता लाभण्यासाठी उपयुक्त असे केंद्र ठरेल.. खऱ्या अर्थाने वनविभागाने या संकुलात अतिशय दर्जेदार स्वरूपाचे बनवल्याने येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांचे कौतुक केले.सहस्रकुंड दौऱ्यानंतर आपल्या कुटुंबासह वन विभागाचे राखीव जंगल असलेल्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी जंगल भ्रमंती केली. व सहस्रकुंड पर्यटनस्थळातील विकासकामांना चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि निधी उपलब्ध करून देऊ असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
Leave a Reply