ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गांधीचे मारेकरी आज त्यांच्यापुढे नतमस्तक होत आहे हाच कॉग्रेस पक्षाच्या विचारांचा विजय आहे: देशमुख

October 3, 202113:08 PM 49 0 0

जालना (प्रतिनिधी) ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारामुळेच देशाची ओळख जगाच्या पाठीवर निर्माण झाली आहे गांधीचे मारेकरी आज त्यांच्यापुढे नतमस्तक होतांना दिसत आहे. हा कॉग्रेसपक्षाच्या विचारांचा विजय असल्याचे जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी अभिवादन कार्यक्रात सांगितले. जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व स्व. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त गांधी चमन जुना जालना येथे शनिवारी रोजी कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री देशमुख हे बोलत होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी गांधी यांनी शास्त्री यांच्या प्रतिमेस पुषपहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले पुढे बोलतांना श्री. देशमुख महणाले की, जय- जवान, जय किसान चा नारा लालबहादुर शास्त्री यांनी देवून शेतकरी आणि देशाच्या सौनिकला महत्वाचे स्थान प्राप्त करुन दिले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. विनायक चिटणीस यांनी प्रस्तावीक करतांना सांगितले. आज महात्मा गांधी यांचे मारेकारी हे देखील आपण बापुच्या विचाराचे असल्याचे दाखवत आहे. परतू संपुर्ण विश्व त्यांच्या मारेकर्‍यांच्या विचाराला ओळखुन असल्यामुळे त्यांची संपुर्ण विश्वात त्यांची फजीती होत असल्याचे दिसून येत आहे. गांधीच्या विचाराची देशाला आज खरी गरज आहे. तरूणांनी गांधीचे विचार आत्मसात केले पाहिजे असे अ‍ॅड. चिटणीस म्हणाले. याप्रसंगी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेद्र राख, आर. आर. खडके, शेख महेमूद, गणेश राऊत, राम सावंत, ज्ञानदेव पायगव्हाणे, विमलताई आगलावे, वसंत जाधव, एकबाल कुरेशी, नंदाताई पवार, अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, नगरसेवक अरुण मगरे, शेख शकील, संगिता पाजगे, चंद्रकात रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, फकीरा वाघ, रहिम तांबोळी, योगेश पाटील, सोपान सपकाळ, शेख वसीम, शेख इब्राहीम, परसराम अवघड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *