ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ असणारी गंगा !

June 17, 202112:41 PM 12 0 0

धार्मिक दृष्ट्या कोटी कोटी हिंदूंना मोक्ष प्रदान करणारी गंगा ही विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे स्थान भगवद्गीतेचे आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये ते स्थान गंगेचे आहे. देवतांना जसे अमृत, तसे मनुष्यासाठी गंगाजल आहे. एवढे महत्व या गंगेला आहे. आनंद, मंगल प्रदान करणारी, सर्व त्रासांचे हरण करणारी आणि सर्व पापे नष्ट करणारी, अशी ही गंगा नदी आहे. सर्व संत, सर्व संप्रदाय यांनी गंगा नदीचे पावित्र्य मान्य केले आहे.भगवान शंकरांनी त्यांच्या मस्तकी गंगा नदी धारण केल्यामुळे शैवांना, श्री विष्णूच्या चरणकमलांपासून गंगेचा उगम झाल्यामुळे वैष्णवांना गंगा नदी अतिशय परमपावन वाटते.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

शक्तांनीही गंगेला आदिशक्तीचे रूप मानून तिची आराधना केली आहे. अशाप्रकारे गंगा नदी सर्वांसाठीच खूप पावन अशी आहे. गोस्वामी तुलसीदास यांच्या कविता वल्लीच्या उत्तरकांडामधील तीन छंदांमध्ये गंगा महात्म्य वर्णन केले आहे. त्यामध्ये गंगा दर्शन, गंगा स्नान, गंगाजल सेवन इत्यादींचे महत्व वर्णन केले आहे. गंगा नदी क्षणार्धात मनुष्याची सर्व पापे नष्ट करते, असे शास्त्रात वर्णन आहे. पुर्वी महाराष्ट्रात गंगोदकाने स्नान करणे शक्य नसल्याने तांब्यापासुन किंवा पितळेपासून बनवलेल्या गंगाळ नावाच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये स्नान करत. संपूर्ण जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे, अशी कोट्यावधी हिंदूंची इच्छा असते. गंगाजल स्नान शुद्धीसाठी तसेच जल शुद्धीसाठी देखील वापरले जाते. त्याचबरोबर मृत्यूनंतर सद्गती मिळावी, म्हणून देखील गंगाजल मृत व्यक्तीच्या मुखात घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे बहुतेकांकडे विविध तिर्थांवरून आणलेले गंगाजल आढळते. गंगेमध्ये अस्थींचे विसर्जन करणे, हा एक प्रमुख अंत्यविधी आहे. जितकी वर्षे गंगेमध्ये त्या अस्थी राहतात, तितकी वर्षे त्या मृतात्म्याला स्वर्गात राहाता येते, असे वर्णन स्कंदपुराण, नारदीय पुराण, अग्निपुराण, महाभारत आणि पद्मपुराण या मध्ये आढळते. पितरांचा उद्धार व्हावा, यासाठी गंगातीरावर श्राद्ध देखील केले जाते. रुरकी विद्यापीठात गंगाजलावर काही प्रयोग करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला की, जंतूंना मारण्याची सर्वाधिक क्षमता इतर नद्यांच्या तुलनेत गंगा नदीच्या जलामध्ये अधिक आहे. गंगेचे पाणी गोड तर आहेच परंतु ते शीतल देखील आहे. ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही दोषांचे शमन करणारे आहे. असे हे गंगाजल पवित्र आहे आणि पथ्यकारकही आहे. अशा या गंगाजलाची आपल्याला भगवंताने अनमोल अशी भेट दिली आहे, त्याविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञ राहू या आणि गंगाजलाचा वापर करताना तिच्या प्रती अंतरामध्ये भाव जागृत ठेवूया, जेणेकरून तिच्या चैतन्याचा आपल्याला लाभ होईल.

अनिता जोशी, संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *