ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे यांचा सत्कार

June 4, 202114:41 PM 8 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्रात येथील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे आणि धम्मसेवक निवृत्ती लोणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, पत्रकार संजय टिके, अॅड. श्रीधर कांबळे, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शिलभद्र, भंते सुगत, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, एस.एच. इंगोले यांची उपस्थिती होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गंगाधर ढवळे यांनी भिक्खू संघासाठी धम्मसंदेश व धम्मदान यात्रेची संकल्पना मांडली होती. या यात्रेचा प्रारंभ कंधार तालुक्यातील कुरुळा येथून करण्यात आला होता. त्यानंतर नांदेड व नांदेड परिसरातील तसेच हिंगोली तथा परभणी जिल्ह्यातील एकूण शंभराहून अधिक गावांत ही यात्रा नेण्यात आली होती. हा उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीही ही धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचा दुसरा टप्पा प्रारंभ होणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.


साहित्य चळवळीतील योगदानाबद्दलही सप्तरंगी साहित्य मंडळ शाखा उमरीच्या वतीने साहित्यिक गंगाधर ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, आकाश प्रकाशन युट्युब चॅनलचे संचालक पांडूरंग कोकुलवार, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, नगरसेवक रतन खंदारे, सतीश खंदारे, उद्धव झडते, एन.एम. कांबळे, बापुराव रिठ्ठेकर, भीमराव ढगारे आदींची उपस्थिती होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सात दिवसीय आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त पाच दिवसीय आॅनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला आयोजित करुन यशस्वी केल्याबद्दल ढवळे यांना शाल व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.
मातूळ येथेही सत्काराचे आयोजन
भोकर तालुक्यातील मातुळ या गावी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांनी साहित्यिक गंगाधर ढवळे यांचा साहित्य चळवळीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल हृद्य सत्कार करण्यात आला. ‘कौतुक माझ्या गावाचं- एक दृष्टिक्षेप’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, मातुळचे सरपंच प्रतिनिधी प्रकाशराव कदम, अक्षय कदम, अरविंद कदम, दत्ताहरी कदम, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, आकाश प्रकाशन यु-ट्यूब चॅनेलचे संचालक पांडुरंग कोकुलवार, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, मातुळ येथील उपसरपंच माधव बोईनवाड, पोलीस पाटील लक्ष्मण बोईनवाड यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *