उरण ( संगिता पवार ) कोरोनाचा भविष्यकाळातील तीसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.सदरची बाब लक्षात घेऊन ही लस आपल्या गावातच मिळावी म्हणुन ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.बळीराम ठाकुर यांच्या प्रयत्नातून आणि राजिप सदस्य श्री.विजय भोईर यांच्या सहकार्याने आज दि १८ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य उपकेंद्र घारापुरी येथे ग्रामपंचायतीचे माध्यमातून गावातील १८ वर्षांवरील नागरीकांसाठी कोविल्डशीलचे डोस उपलब्ध करण्यात आले होते.यामध्ये पहिला डोस..३० आणि दुसरा डोस..१०८ ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सदस्या तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच तालूका आरोग्य अधिकारी उरणचे डॉ.ईटकरे वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र कोप्रोली डॉ.भोसले, श्री.निलेश झावरे त्यांचे सहकारी या सर्वांचे सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मनापासुन आभार मानले.
तसेच १८+ वयोगटावरील नागरिकांचे १००% लसीकरण लवकरच १००% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री बळीराम ठाकुर यांनी सांगितले.
त्यामुळे घारापुरी येथेच नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करुन ग्रामपंचायतीला धन्यवाद देत आहेत.
Leave a Reply