ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्या शिवाय लग्न करू नये’- डॉ.सोनाली जेथलिया

February 3, 202113:31 PM 38 0 0

जालना- ‘मुलींनी स्वताच्या पायावर उभे रहिल्याशिवाय लग्न करू नये, कुटुंबीयांना विश्वासात घेवुन आपले करियर घडविन्यासाठी प्रयत्न करावे. तुम्ही ठरविले तर काही पण करू शकता, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे ती ओळखने गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन इनरव्हिल क्लबच्या डॉ.सोनाली जेथालिया यांनी विद्यार्थ्यांना संबोधतांना केले. त्या ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ आयोजित बाल कला महोत्सव प्रसंगी बोलत होत्या.

दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ आयोजित बाल कला महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा’ यंदाचा बालकला महोत्सव ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी जोमा मस्ती, प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हिल क्लबच्या डॉ.सोनाली जेथलिया, रश्मी गिनदोडींया, वैशाली मत्सावार संस्थेचे सुभाष क्षिरसागर, गोविंद खुळखुळे, कृष्णा वराडे, कौशल्या खरात, कैलास कोल्हे, दिपक काळदाते, समर्थ डोंगरे, सचिन सपकाळ, असेफ कुरैशी, शिवाजी काजळकर, जितेन्द्र खिल्लारे, राहुल सोनावने, संध्या बोरुडे यांची उपस्थिती होती.

जग कोरोना सारख्या महामारीशी सामना करत असतांना देखील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरुपामध्ये भाषण, गायन, नृत्य सादर केली. जालना जिल्यातील वेगवेळ्या केंद्रामधून विद्यार्थी व पालक गुगल मिट द्वारे ऑनलाइन सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य यास्पर्धामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *