ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मला न्याय द्या नाहीतर आत्महत्येची परवानगी तरी द्या सामाजिक कार्यकर्ता – संतोष कांबळे यांचे पोलीस महासंचालक यांना निवेदन

January 12, 202214:44 PM 54 0 0

गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस महासंचालकांकडे केली तक्रार शितलकुमार बल्लाळ यांच्यावरती संतोष कांबळे यांचे गंभीर आरोप

काय आहेत आरोप

विनाकारण ठाणे मध्ये नेऊन जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणे तसेच खोटे गुन्हे दाखल करून असेच वारंवार खोटे गुन्हे दाखल करून तडीपार करण्याची धमकी इत्यादी गंभीर आरोप संतोष सखाराम कांबळे यांनी केले असून पोलीस महासंचालक यांच्या कडे याविषयी निवेदन देखील दिली आहे
गोंदी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे आपल्या पदाचा गैरवापर करत असून मनमानी कारभार करत असून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या बाबत अनेक निवेदने आंदोलन तसेच उपोषण केले व पोलीस आयुक्तालय औरंगाबाद या ठिकाणी देखील निवेदन दिले आहे
शितलकुमार बल्लाळ यांच्याकडून सखाराम कांबळे यांना दिनांक 25 2 2019 रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान गोंदी पोलीस ठाण्यात निघून जाते व मारहाण करून खोटा गुन्हा तसेच अजूनही असेच खोटे गुन्हे दाखल करून रेकॉर्डवर घेऊन मोका तडीपार अंतर्गत कारवाई महत्वाची करण्याची धमकी देखील देत असल्याचे या निवेदनामध्ये सखाराम कांबळे यांनी म्हटले असून पीआय शितलकुमार बल्लाळ यांच्या निलंबनाचा बाबत व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करणे साठी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस आयुक्तालय औरंगाबाद या ठिकाणी देखील निवेदन देऊन न्याय मिळाला नाही
त्यांच्या या त्रासाला कंटाळलो असून मला न्याय द्यावा नाहीतर आत्महत्या ची परवानगी द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे संतोष सखाराम कांबळे यांनी केली आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *