ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात लसीकरणाला अधिक प्रमाणात गती द्या 30 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात 75 टक्के लसीकरण होईल यादृष्टीने नियोजन करा- पालकमंत्री राजेश टोपे

October 19, 202114:53 PM 9 0 0

जालना : दि. 18 कोरोना या आजारामध्ये कवचकुंडलाची भूमिका बजावणाऱ्या लसीकरणामध्ये जालना जिल्हा राज्याच्या तुलनेत मागे राहु नये यासाठी जालना जिल्ह्यात लसीकरणाची गती अधिक वेगवान करण्यात यावी. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत जालना जिल्ह्यात 75 टक्के लसीकरण होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डॉ. जयश्री भुसारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले, जालना जिल्हा हा लसीकरणात राज्याच्या तुलनेमध्ये मागे न राहता प्रथम 10 जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट होईल, यादृष्टीने लसीकरणाचे नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात महाविद्यालये सुरु करण्यात आली असुन या महाविद्यालयांमधुन विशेष कँपचे आयोजन करत विद्यार्थ्यांना लस टोचण्याचे नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागामध्ये आजही नागरिकांच्या मनामध्ये लसीविषयी शंका असल्याचे दिसत असुन लस ही पुर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी लोकप्रतिनिधी, धर्मगुरु आदींची मदत घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.
कोरोनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढु नये यासाठी जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची माहिती पोर्टलवर अपडेट होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याच्या सुचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या. जिल्हा मुख्यालयाबरोबरच तालुका स्तरावर आरोग्य सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून अंबड व घनसावंगी येथील 100 खाटांच्या रूग्णालयाच्या उभारणीसाठी त्वेरेने काम करण्याच्या सुचना करत सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरलचे कामही पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या. संपुर्ण मराठवाड्यासाठीचे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे उभारण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून या रुग्णालयाच्या उभारणीसाठीच्या कामास गती देण्याबरोबरच जालना येथे मोठी औद्योगिक वसाहत असुन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामगार काम करतात. या कामगारांसाठी ईसीआयचे मोठे हॉस्पीटल उभारणीसाठी कामगारांची नोंदणी अधिक वेगाने करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *