जालना (प्रतिनिधी) ः सर्वेाच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजावर फार मोठा आघात झालेला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासह विविध मुद्यावर विचार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सी डोके यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
https://indianfast.com/
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला ओ. बी. सी. प्रवर्गातुन आरक्षण द्यावे. माजी न्यायमूर्ती भोसले समितीच्या अहवालावर राज्य सरकारने तातडीने दोन दिवसाचे अधिवेशन बोलवावे आणि भोसले समितीने केलेल्या शिफारशी अंमलात आणाव्यात राज्य सरकारने जो नियोजित मागासवर्गीय आयोगावर ज्या लोकांची सदस्य म्हणुन नेमणुक केलेली आहे त्यामध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधींची नेमणुक करावी व मराठा आरक्षाणाला विरोध करणाऱ्या लक्ष्मण हाके सारख्या व्यक्तींना काढुन टाकण्यात यावे, मराठा समाजाला जो पर्यत आरक्षण मिळत नाही तोपर्यत बोर्डाच्या बरोबरीने सारथी संस्थेला सुध्दा पैसा पुरवावा. ज्यामुळे मराठा तरूण वेगवेळ्या परिक्षांसाठी पात्र ठरतील मराठा आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळवर भरपुर निधी उपलब्ध करून द्यावा व त्या आधारे होणाऱ्या कर्जप्रकरणातील जाचक अटी जमीन तारण ठेवाणे, आयटी रिटर्न मागणे, ठराविक बँक या कर्जासाठी नेमुण देणे यासह इतर अटी काढुन टाकाव्यात ज्यामुळे मराठा तरूण उद्योगधंदे करुन स्वातःच्या पायावर उभा राहील जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना जे लाभ मिळत आहे ते सर्व लाभ मराठा विद्यार्थ्यांना देण्यात यावे यासह विविध मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष वैभव नालेगावकर, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई तौर, जिल्हा उपाध्यक्ष सतिश कदम, शहराध्यक्ष योगेश हाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply