ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली ईतिहास आझादी गौरव; यात्रेच्या माध्यमातून गावागावात पोहचविणार : पवार

August 8, 202212:39 PM 12 0 0

जालना (प्रतिनिधी) ः देशाचा स्वातंत्र्य लढा हा काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली लढला गेला असून यासाठी लाखो भारतीयांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून गौरवशाली ईतिहास निर्माण केला आहे. या संदर्भातील स्वातंत्र्याचे विचार गावागावात आणि नवतरूणांमध्ये रूजविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आझादी गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती जालना जिल्ह्याचे प्रभारी तथा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. नामदेव पवार यांनी जिल्हा व शहर काँग्रेसच्या आयोजीत बैठकीत दिली.
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार रोजी व्हिआयपी विश्रामगृह जालना येथे दुपारी आझादी गौरव यात्रेच्या पुर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री पवार हे बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गेोरंट्याल, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रा. सत्संग मुंढे, प्रभाकर पवार, विजय चौधरी, गणेश राऊत, जावेद बेग आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री पवार यांनी सांगीतले की, आझादी गौरव यात्रा संपुर्ण जिल्ह्यात काढण्यात येणार असून तालुका पातळीवरून सर्व तालुकाध्यक्ष स्वतंत्रपणे आपआपल्या भागातील नियोजन करणार आहेत. एकुण 75 कि. मी. अंतराचा प्रवास या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी आ. कैलास गोरंट्याल आपल्या भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन करतांना सांगीतले की, दिनांक 9 ते 15 ऑगस्ट पर्यंत काढण्यात येणाऱ्या आझादी गौरव यात्रेत काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्य लढ्यातील ईतिहास गावागावात पोहचवून ही यात्रा यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगीतले की, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांनी येत्या दोन दिवसात आझादी गौरव यात्रेचे यशस्वी नियोजन करून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून यात्रेची सुरूवात करावी. पदयात्रेच्या समाप्तीच्या दिवशी जिल्ह्यातील पदाधिकारी प्रत्येक तालुक्यात पोहचवून मार्गदर्शन करतील असे त्यांनी यावेळी सांगीतले.
या बैठकीत काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख महेमूद व तालुकाध्यक्ष वसंत जाधव, त्रिंबक पाबळे, लक्ष्मणराव मसलेकर, विठ्ठलसिंग राजपुत, निळकंठ वायाळ, रामप्रसाद खरात यांनी आपल्या तालुक्यातील नियोजना संदर्भात सविस्तर माहिती यावेळी बैठकीस सादर केली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब खंदारे यांनी केले. या बैठकीत राम सावंत, सुभाष मगरे, कृष्णा पडूळ, शेख शमशोद्दीन, विनोद यादव, ज्ञानेश्वर तनपूरे, चंदाताई भांगडीया, नंदाताई पवार, मंगल खांडेभराड, मंजु यादव, शेख शकील, अशोक नावकर, सय्यद करीम बिल्डर, बाबासाहेब सोनवने, गणेश चांदोडे, शेख इब्राहिम, फकीरा वाघ, अनिल कांबळे, मुमताज अंसारी, मनोहर उघडे, शेख जावेद बागवान, शेख अनवर, रहिम तांबोली, ईरशाद कुरेशी, संजय पाखरे, गुड्डू खान, भाऊसाहेब शिरसाट, योगेश पाटील, मोईन कुरेशी, सिराज खान, मुसा कुरेशी, विठ्ठल गिराम, सोपान सपकाळ, वल्लभ कुलकणी, मुफस्सिर कुरेशी, खालेद मशायक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *