ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निर्मल प्रकाशनच्या वतीने शिक्षक साहित्यिकांचा गौरव

September 10, 202115:18 PM 15 0 0

नांदेड – येथील नामांकित निर्मल प्रकाशन संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील काही शिक्षक साहित्यिकांचा सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक व साहित्य विषयक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी, माध्यमिक शिक्षक मिलिंद ढवळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथील प्राथमिक शिक्षक गंगाधर ढवळे, यशवंत विद्यालय उमरीचे सहशिक्षक नागोराव डोंगरे, कृष्णामाई माध्यमिक विद्यालय, बळेगावचे रणजीत गोणारकर, प्रकाश ढवळे, श्रीकांत मगर, साईनाथ रहाटकर आदींची उपस्थिती होती.


भारताचे माजी राष्ट्रपती तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन सबंध भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी मिलिंद ढवळे ( ललित लेखक), गंगाधर ढवळे ( समीक्षक), नागोराव डोंगरे (ग्रामीण कवी), रणजीत गोणारकर (कवी) यांचा बुके देऊन सत्कार केला. यावेळी बोलतांना सूर्यवंशी म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण हे कोरोनाच्या अक्राळविक्राळ जबड्यात अडकले असून मुलांचे भावी शैक्षणिक आयुष्य संकटात सापडले आहे. देशाच्या भावी पिढी घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षकांच्याच हातात आहे आज आॅनलाईन पद्धतीने शिक्षण ही काळाची गरजच बनली आहे. परंतु शहरासह ग्रामीण भागात ही प्रणाली म्हणावी तशी यशस्वी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक साहित्यिकांनी साहित्याबरोबरच शिक्षण प्रक्रियेची सैद्धांतिक तथा व्यवहार्य मांडणी करावी, असे ते म्हणाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *