ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गो सेवा हिच ईश्वर सेवा

May 14, 202212:42 PM 31 0 0

उरण (तृप्ती भोईर) : द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविरा रजि नंबर २९१ उरण रायगड यांच्या तर्फे आज दि. १२ मे २०२२ रोजी सकाळी रस्त्यावरील अनाथ गाई व पंक्षी यांना पाणी पिण्यासाठी व चारा, दाणे ठेवण्यासाठी. बोकडविरा ते सिडको ट्रेनिंग सेन्टर या परीसरात भांडी ठेवण्यात आली आहेत.
अतिशय कडक उन्हाळा सुरू आहे. अशा वेळेस अनाथ गाई, पंक्षी यांचा पाण्या अभावी तडफडुन मुत्यु होऊ नये.त्याची पाणी ,चारा, दाणे यांपासून गैरसोय होऊ नये . या उद्देशाने निस्वार्थ सेवेसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेचा हा सुक्त उपक्रम.
नागरीकांना एक विनंती आहे. कुपया चारा , चपाती,पक्षासाठी दाणे , पाणी टाकताना त्या परीसरात ठेवण्यात आलेल्या भांड्यामध्ये टाकण्याची कुपा करावी. जेणे करून अन्न मातीत पडुन खराब व सुकणार नाही. जनावरांना खाण्याजोगे राहील.
या कार्यक्रमासाठी उपस्थित समाज सेवक विकास पाटील, घनश्याम पाटील, शिवकुमार पाटील, नरेंद्र पाटील, गंगाराम पाटील, शिवाजी ठाकूर,जितेंद्र पाटील , दिप्ती पाटील, मंजुळा पाटील, मयुरी तांडेल, प्राजक्ता तांडेल, पुष्पलता पाटील, यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *