ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बकरी ईद सणानिमित्त मार्गदर्शन सूचना

July 18, 202112:55 PM 38 0 0

जालना  :- जिल्ह्यात दिनांक 21 जुलै 2021 रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे) बकरी ईद हा सण आहे. हा सण साधेपणाने साजरी करणे त्याबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शन सूचना प्रशासनाकउून करण्यात आल्या आहेत.

कोविड-19 मध्ये उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थीमुळे राज्यात सर्व धार्मीक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न कराता, नागरिकांनी अपल्या घरीच अदा करावी, सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांनी जनावरे खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी ऑनलाईन अथवा दुरध्वनी वरुन जनावरे खरेदी करावी, नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, सध्या लागू करण्यात आलेले Level of Restrictions For Breaking the chain दि. 4 जून 2021 आणि त्यानंतर वेळीवेळी निर्गमित केलेल्या सुचनानुसार इतर निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही, बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमु नये,कोविड या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनवर्सन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित नगर पालीका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे जिल्हादंडधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, जालनाचे डॉ विजय राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *