ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देव तारी त्याला कोण मारी; अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पड……ला आणि तेवढ्यात रेल्वे आली……

April 19, 202112:50 PM 53 0 0

रायगड : कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे. येथे एक लहान मुलगा आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि समोरुन भरधाव वेगाने गाडी येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. तेव्हा रेल्वेचा एक पॉईंटमन देवदितासारखा धावून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता या चिमुकल्याचे प्राण वाचवले.

नेमकं काय घडलं?
एक आंधळी आई 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आपल्या मुलाला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय, पण काहीही दिसत नसल्याने तिला कळेना काय करावं, तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ही आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राकत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली.

भरधान येणाऱ्या मेलसमोर धावत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचे आणि मुलाचे प्राण वाचविले. मयुर शेळके या पॉईंटमनच्या धाडसामुळे ट्रॅकवर पडलेल्या छोट्या मुलाचे प्राण वाचले आहेत. मयुर यांच्या धाडसाचा हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *