ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पंचमुखी महादेव मंदिरात देवी भागवत कथेला प्रारंभ देवी शतचंडी यज्ञाचेही आयोजन

February 25, 202213:57 PM 32 0 0

जालना :  जुना जालना भागातील इतवारा गल्‍ली स्थित प्राचीन कोळेश्‍वर पंचमुखी महादेव मंदिरात महाशिवत्रीनिमित्त देवी भागवत कथा व देवी शतचंडी यज्ञ व अखंड हरिनाम सप्‍ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान भागवत कथेसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
देवी भागवत कथेचे निरूपण भागवताचार्य अमोलमहाराज देशमुख – पाथ्रूडकर हे करीत आहेत.तर शतचंडी यज्ञाचे पौरोहित्य वेदमूर्ती शुभममहाराज भागवत हे करत आहेत. सप्‍ताहा दरम्यान योगीराज महाराज लोखंडे, बाळू महाराज शेळके, प्रभाकर महाराज सुरासे, विष्णूमहाराज मुळे, सतीश महाराज बनकर, भगवानमहाराज नागवे,बालाजी महाराज यांचे सायंकाळी हरिकीर्तन तर 2 मार्च रोजी अनिलमहाराज नांदे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन पंचमुखी भक्‍त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *