खालापूर – खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी परीसरात घडणारे अपघात आणि त्यावेळीं मदत करताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून काही अत्यावश्यक साहित्य आपल्या यंत्रणेकडे असावे आणि ते उपलब्ध व्हावे यासाठी गोदरेज आणि बॉईस मँन्यु कंपनीकडे प्रस्ताव ठेवला होता. गोदरेज कंपनीने आपल्या सीएसआर फंडातुन आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक समुग्रीचा संच 6 अक्टो 2021 रोजी खालापूर येथे आयोजित कार्यक्रमात खालापूरचे तहसिलदार अयुब तांबोली, पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्याकडे गोदरेजचे व्यवस्थापक राजेंद्र पाशिलकर, तानाजी चव्हाण अनंता दळवी यांनी सामुग्री हस्तांतरित केली.
पोलीस आणि महसूल प्रशासनाला नेहमीच मदत करणाऱ्या अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी सामाजिक संस्था,सहजसेवा फाऊंडेशन, यशवंती हायकर्स सारख्या संस्थाच्या कार्यपद्धतीचे यावेळी कौतुक करण्यातआले. यावेळी तहसिलदार अयुब तांबोळी, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, गोदरेजचे व्यवस्थापक राजेंद्र पाशिलकर, तानाजी चव्हाण, अनंता दळवी, अनुभव ट्रस्ट अध्यक्ष दिलीप आखाडे, उप पोलिस निरिक्षक बजरंग राजपूत, सहाय्यक पोलिस निरिक्षक शेखर लव्हे, गणेश कराड व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात तहीलदार अयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, गोदरेज व्यवस्थापनाचे राजेंद्र पाशिलकर आणि तानाजी चव्हाण,अनुभव ट्रस्ट अध्यक्ष दिलीप आखाडे, अपघात टीमचे गुरूनाथ साठेलकर यांनी आपले विचार मांडले. जगदीश मारगजे यांनी सूत्र संचालन तर उप पोलिस निरिक्षक बजरंग राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले.
खालापूर तालुक्यातील गोदरेज आणि बॉईस मँन्यु.कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने कारखानदारी करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने करते, CSR फंडातून असंख्य लोकहिताचे उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. त्यात या स्त्युत उपक्रमाची भर पडलीआहे. सर्वच स्तरावरून यासाठी गोदरेज व्यवस्थापनाचे कौतुक होत आहे.अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडे आपत्ती प्रसंगी वापरण्यासाठी अत्याधुनिक बोट, दुर्बीण, ग्रो प्रो कँमेरा, सुरक्षा जँकेट, हार्नेस, स्ट्रेचर, स्कँनर एलईडी सर्च लाईट इत्यादी सामुग्रीपैकी काही सामुग्री पोलीस यंत्रणेने हस्तांतरीत केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितू सकपाळ, अनिल मरागजे, अशोक मरागजे, अपघातग्रस्त टिमचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, राजेश पारठे, हनिफ कर्जीकर अमोल ठकेकर, भक्ती साठेलकर, समाधान दिसले, विकी भालेराव, दिनेश पाटील, सारिका सावंत, अर्जून कदम, फरहान कर्जीकर, नवज्योत पिंगळे, यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील, सामाजिक संस्थांचे प्रमुख, राजकीय नेते तसेच पत्रकार मंडळी कार्यक्रमात सहभागी झाली होती.
Leave a Reply