ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोलापांगरी दुधना काळेगाव रस्ता बनतोय खड्डेमय

April 11, 202215:57 PM 35 0 0

जालना (राजकिरण लिहिणार) : जालना तालुक्यातील बठाण बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील दुधना नदी च्या वाळूचा लिलाव झालेला आहे . येथील वाळू उपसा करणारे जड वाहने मोठ्या प्रमाणावर गोलापांगरी ते दुधना काळेगाव या रस्त्यावर ये जा करतात. म्हणून येथे खड्डे पडत असल्याचे या आवारातील नागरिक म्हणतात . हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.
बठाण बुद्रुक शिवारातील दुधना नदीचा वाळू उपसा होत असल्याने येथे नदीचे पाणी जमिनीत मुरणार नाही व जमिनीतील पाण्याचा साठा खोल जाईल त्यामुळे येथे असणाऱ्या बागायती क्षेत्रावर या वाळू उपसा चा दुष्परिणाम होईल असे मत शेतकरी बळीराम देवडे यांनी व्यक्त केले. एकंदरीतच बघितला तर रस्ते खड्डेमय होत आहेत. तसेच पाण्याची पातळी खोल जाईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केलेली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *