मुरूड जंजिरा (प्रतीनिधी नैनिता कर्णिक) रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारीतील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून पहिल्या बॅचमध्ये १०० विद्यार्थी यांना डॉक्टर होण्याची सुवर्णसंधी लवकरच मिळणार आहे.अशी सर्व माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मान. आदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा,लेक्चर हाॅल कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरिय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले.
मान.पालकमंत्रीआदिती तटकरे यांनी अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यसिद्धीस नेण्यासाठी व मोलाचे सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार सुनील तटकरे या सर्वांचे आभार मानले. पत्रकार परिषदेस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधै,अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे, तहसिलदार सचिन शेजाळ, पोलिस निरीक्षक शैलेश सणस, आरसीएफचे शांताराम देशमुख, भालचंद्र देशपांडे, प्रमोद देशमुख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply