ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शुभेच्छारुपी आशिर्वादामुळे काम करण्याची उर्जा मिळाली-आ.कैलास गोरंट्याल

April 10, 202216:30 PM 52 0 0

जालना (प्रतिनिधी) : वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून मिळालेल्या शुभेच्छारुपी आशिर्वादामुळे काम करण्यासाठी मोठी उर्जा मिळाली, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधी मंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केले. तत्पूर्वी आ. कैलास गोरंट्याल यांनी आपल्या प्रितीसुधानगर येथील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त केक कापला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल व परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मित्र परिवाराकडून जालना शहर व विधानसभा मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करुन त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. गेल्या काही दिवसापासून उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आ. गोरंट्याल यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित न राहता जालना शहरातील गुरु गणेश भवन च्या सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उपस्थित राहून विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी युवा नेते अक्षय गोरंट्याल यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी आ. कैलास गोरंट्याल यांनी गुरु गणेश म. सा. यांचे दर्शन घेतल्यानंतर ते कार्यक्रम स्थळी आले.
प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार्‍यांमध्ये रिसोड येथील आ. अमित झनक, आ. बलवंत, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हभप नाना महाराज पोखरीकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, एकबालसिंग गिल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फुलचंद भक्कड, शहर कांँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, जालना मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, विनीत साहनी, जेपीसी बँकेचे माजी चेअरमन दिपक भुरेवाल, भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे बदर चाऊस, रऊफभाई परसुवाले, उद्योजक केदार मुंदडा, नरेंद्र अग्रवाल, सुदेश सकलेचा, अरुण घडलिंग, गोपाल चित्राल, प्रदीप मुथा, कचरुलाल कुंकलोळ, जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, रुख्मीनी ग्रुपचे दळवी, नगरसेवक महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, शाह आलमखान, जगदीश भरतिया, विनोद रत्नपारखे, अरुण मगरे, वाजेद खान, आरेफ खान, मजहर भाई, विष्णू वाघमारे, हरेष देवावाले, राहुल हिवराळे, श्रावण भुरेवाल, राज स्वामी, नजीब लोहार, मोहन इंगळे, डॉ. विशाल धानुरे, फकीरा वाघ, मुरलीधर जाधव, दिलीप मोरे, भानूदास राठोड, संजय शेजूळ, ज्ञानेश्वर डुकरे, कृष्णा पडूळ, अंजेभाऊ चव्हाण, दत्ता पा. घुले, सोपान तिरुखे, अ‍ॅड. शेजुळ, गणेश खरात, गजानन खरात, समाधान शेजुळ, दत्ता शिंदे, माजी नगरसेवक बाबुमामा जाधव, वैभव उगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, बाळासाहेब तनपूरे, सुरेश खंडाळे यांच्यासह जालना शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे माजी सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, जालना शहरातील उद्योजक, व्यापारी, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवरांनी गुरु गणेश भवन येथे उपस्थित राहून आ. कैलास गोरंट्याल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *