ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खोपोली शहरातल्या भटक्या कुत्र्यांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

October 6, 202114:44 PM 11 0 0

खोपोली : 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज निवरण दिन आणि 4 ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून व्हीं पी डब्ल्यू ए, श्रीकृपा एक्वेरियम, covid-19 ॲनिमल ग्रुप – खोपोली, आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था – रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस निशुल्क देण्याची मोहीम राबविली होती.


साधारणपणे तीन दिवस सुरू असलेल्या या मोहिमेत सर्व संस्थांच्या सोबत शिवदुर्ग मित्र मंडळ – लोणावळा यांचाही सहभाग होता. खोपोली शहरातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन जवळपास दोनशेच्या दरम्यान भटक्या कुत्र्यांना लस देऊन रेबीज मुक्त केले आहे. या मोहिमेसाठी हिमालया आणि डूरल्स या ऍनिमल फूड निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी डॉग फुड देऊन सहकार्य केले. खोपोली शहरात या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे यांनी शुभेच्छा दिल्या. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. आगामी काळात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवली जाईल असा विश्वास मोहिमेचे मार्गदर्शक डॉक्टर राहुल मुळेकर यांनी दिला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *