जालना/प्रतिनिधी संपुर्ण महाराष्ट्रात भीम आर्मीतर्फे सम्यक संवाद यात्रा काढण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात या यात्रेस चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भीम आर्मीचे राज्य प्रमुख प्रफुल्लभाई शेंडे यांनी दिली. जालना येथे 11 जुलै रोजी सम्यक संवाद यात्रा अंबड चौफुली जूना जालना येथे आली होती. त्यावेळी ते बोलत होती.
यावेळी राज्य संघटक रणजित माने यांची उपस्थिती होती. याचवेळी प्रफुल्लभाई शेंडे यांच्या हस्ते जालना जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांच्यातर्फे दिलेला 10 हजाराचा निधी रिजवाना शेख ह्या बालिकेला देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे, राज्य संघटक रणजित माने, राज्य उपाध्यक्ष,मुकेश खडतकर,, राज्यसचिव अमोल चिमनकर ,नागपूर ग्रामीण अध्यक्ष अंकुर दुपारे ,नागपूर उपाध्यक्ष ,नरेंद्रभाई शेंडे, रोहितभाई नंदेश्वर आदि होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी केले. यावेळी जिल्हा सल्लागार एम.यु.पठाण, , जालना शहराध्यक्ष रविभाऊ ढाकणे , जिल्हा मार्गदर्शक वामनराव लांडगे ,शहर उपाध्यक्ष अशोकराव झिंगे, मंठा तालुकाध्यक्ष सुजित मोरे, उपाध्यक्ष अॅड. संतोष मोरे, अॅड. सोहन पारे, तालुकाध्यक्ष सुनिल पाडमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जातीचे अध्यक्ष मा.गायकवाड साहेबांचे मा.प्रफुल्लभाई शेंडे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन स्वागत केले.
Leave a Reply