ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण महिला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था उरण यांच्या वतीने अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विद्यालयास सदिच्छा भेट

June 6, 202218:24 PM 24 0 0

उरण (तृप्ती भोईर) : मधील उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक ४ जुन २०२२ रोजी अक्षरस्पर्श महिला व मतिमंद निवासी विद्यार्थी विद्यालय व कार्यशाळा पुणे येथे जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , बिस्कीट पुडे तसेच तेथील महिलांना सुस्थितीतील साड्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पिशव्या शिवण्यासाठी जवळ जवळ २०० साड्या गोळा करून देण्यात आल्या या साड्या देण्यासाठी संस्थेतील सदस्या व उरणमधील महिला यांनी सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे अक्षरस्पर्श महिला मतिमंद निवासी विद्यार्थी विद्यालय या संस्थेस ५००० रू देणगी स्वरुपात विद्यालयाच्या संस्थापिका सौ. दिपाली संदीप निखळ मॅडम यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले .
अक्षरस्पर्श निवासी मतिमंद विद्यालय जांभुळ वाडी कात्रज पुणे या संस्थेत पंचवीस विद्यार्थी अनाथ,आणि अत्यंत गरीब घरातील आहे. यांच्या शिक्षणाचा खर्च ,जेवणाचा खर्च , संस्थेच्या आणि समाजातील दानशूर व्यक्ती कडून केला जातो. गरीब घरातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण देऊन समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अक्षरस्पर्श या संस्थेची स्थापना झाली. याशिवाय अक्षरस्पर्श संस्था निराधार महिलांसाठी काम करते, त्यांना रोजगार मिळवून देते.बेघर महिलांना निवारा देत आहे.
मतिमंद मुलांसाठी रिरियटेबल बुक च्या माध्यमातून हार्मोनियम, संगीत, तबला , नृत्य थेरेपी, अभिनय, योगासने, चॉकलेट, बागकाम, आकाशकंदील, पेपर बॅग, दिवाळी पणत्या, उटणे अगरबत्ती इत्यादी उपक्रमांतुन मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर महिलांना शिवणकाम, हस्तकला, तोरणे, ब्युटी पार्लर मार्गदर्शन,पर्स कापडी बॅग,पायपुसणी, मेणबत्ती बनविण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
आतापर्यंत अक्षरस्पर्श संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला प्रशिक्षण घेऊन आपल्या संसारात स्वावलंबी बनल्या आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी या संस्थेसाठी सढळ हाताने मदत करावी.
उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण यांचा हा उपक्रम ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्तचे औचित्य साधून “प्लास्टिक पिशवी चा वापर टाळा व पर्यावरण संतुलन राखा” हा मोलाचा संदेश या उपक्रमातुन देण्यात आला.या उपक्रमात सहभागी झालेले सर्व सभासद महिला संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, सचिव निशा शिरधनकर, खजिनदार वर्षा पाठारे, सदस्य कल्याणी दुखंडे, अफशा मुकरी, नाहिदा ठाकुर, प्रगती दळी, गौरी मंत्री, दिपा मुकादम, ज्योत्स्ना येरूणकर, कल्पना तोमर, सिमा घरत, शिल्पा शेडगे,तृप्ती भोईर आदी सदस्यांनी आपले योगदान दिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *