देवकी वसुदेव ठेवले बंदीवासात
कंस ठार करणार होता बाळाला
देवाची लीला आहे मोठीअगाध
पाय लागताच महापूर ओसरला
वसुदेवाने बाळाला नेले नंदाघरी
जन्म दिला देवकी मातेने
नंदाघरी श्री कृष्ण वाढला
पालन केले यशोदा मातेने ll
श्रीकृष्ण जन्माष्टमी येते श्रावणात
गोकुळाष्टमी सण साजरा करतात
जन्मोत्सवा वेळी पोथी वाचतात
दही पोहे, सुंठवडा नैवेद्य दाखवतात ll
दूसरा दिवस असतो गोपाळकाला
दहीहंडी उत्सव साजरा करतात
दहीहंडी फोडली जाते मजेत
एकत्रित येऊन दहीकाला वाटतात ll
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला बंदी
श्रीकृष्णा एकच मागणे मागते
संकट दूर होऊदे राहू या आनंदी ll
सौ नैनिता नरेश कर्णिक
मु पोस्ट ता मुरुड जंजिरा
जिल्हा रायगड
मोबाईल नं ९१३०७६६०६
Leave a Reply