ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोर सेनेच्या साखळी उपोषणाची आज सांगता

August 19, 202116:20 PM 31 0 0

जालना ( प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदोन्नतीमधील रद्द झालेले आरक्षण पुर्ववत करावे, ओबीसींची जातिनिहाय जनगणना, तांडा वस्ती सुधार योजना, रखडलेली प्राध्यापक भरती या व अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पासून जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून तिसऱ्या दिवशी गुरूवारी ( ता. १९) गुरूवारी अंबड व घनसावंगी भरपावसात गोर सैनिक ठाण मांडून बसले आहेत.

ओबीसी घटकांवरील अन्याय दुर करावा या साठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण,प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गत आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी साखळी उपोषणात परतूर व मंठा तालुक्यातील पदाधिकारी व गोर सैनिकांनी सहभाग नोंदवला .तर आज बुधवारी जालना आणि जाफ्राबाद तालुक्यातील गोर सैनिक सहभागी झाले.यात जिल्हा सहसचिव पंकज राठोड,जालना तालुका ध्यक्ष रितेश पवार, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष अनिल पवार, अजय राठोड, अमोल चव्हाण, निरंजन चव्हाण, किरण राठोड, नेहरू आढे, राजू चव्हाण, एकनाथ राठोड, विनोद चव्हाण, शरद पवार, लखन राठोड, ज्ञानेश्वर राठोड,यांच्या सह पदाधिकारी व गोर सहभाग नोंदवला. दरम्यान गुरूवारी अंबड व घनसावंगी तर शुक्रवारी बदनापुर व भोकरदन तालुक्यातील गोर सैनिक सहभागी होणार असून साखळी उपोषणाची सांगता होईल. असे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *