ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मंत्री नवाब मलिकांच्या घरी सरकारी पाहुणे, पहाटेपासून ईडी चौकशी सुरू

February 23, 202215:22 PM 46 0 0

मुंबईः माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार, अशी ट्वीट करून वारंवार माहिती देणारे आणि गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे महाविकास आघाडीतील अल्यसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची अखेर ईडीने चौकशी सुरू केल्याचे समजते. मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरू आहे. अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी केलेल्या आरोपांनी राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.
का चौकशी सुरू?
फडणवीसांनी असाही आरोप केला होता की, या जमिनीची विक्री सरदार शाह वली खान आणि सलीम पटेलने केली होती. नवाब मलिकही यांचेही काही काळ या कंपनीशी संबंध होते. कुर्ला येथील एलबीएस रोडवरील या 3 एकर जमिनीची किंमत साडेतीन कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, ती केवळ 20 ते 30 लाखांत विकली. याचे सर्व पुरावे आपण केंद्रीय संस्थांना दिले आहेत, असा दावाही केला होता. मलिकांची याबाबतच चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र, अजूनपर्यंत तरी ईडीकडून कसलिही माहिती देण्यात आली नाहीय.
कासरकडून पुरावे मिळाले?
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झालीय. विशेषतः दाऊद इब्राहीमच्या जवळच्या लोकांची मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी सुरू आहे. त्यात कासकर ईडीच्या सात दिवसांच्या कोठडीत आहे. या चौकशीत कासकर आणि मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याची काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *