ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला hirkani[email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ वेदप्रकाश पाटील आयुर्वेद रुग्णालयात भव्य बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर

January 9, 202213:50 PM 58 0 0

जालना:- धरती जनसेवा प्रतिष्ठान संचलित डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद रुग्णालयात भव्य बिन टाक्याचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सुरवातीला महिला रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय अहवालानंतर रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. शल्यविशारद डॉ. एस बी गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली 87 बिनटाका कुटुंब कल्याणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना घ्यावयाच्या काळजीबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज कुरेशी, डॉ. अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उदयसिंह पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, प्रशासकिय अधिकारी श्री भागवत शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनल ठोसर यांचे सहकार्य लाभले तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी ,डॉ पात्रे, डॉ शिंदे, श्री चंद श्री दिलीप वाघमारे, एम डी देशमाने, श्रीमती भगत, श्री राठोड,श्री चव्हाण रुग्णालयातील सर्व आरोग्य सेवक, सेविका तसेच आशा कर्मचारी आणि यांनी विशेष मेहनत घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *