ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगर परिषद जालना अंतर्गत 39 विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ

August 23, 202114:46 PM 63 0 0

जालना प्रतिनिधी पत्रकार (अनिता पवार) आज दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जालना नगर परिषद अंतर्गत जालना शहरातील विविध योजने अंतर्गत 30 कोटी रुपयांच्या एकूण 39 विकास कामांचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यात प्रामुख्याने आमदार श्री कैलाशजी गोरंट्याल. (विधानसभा सदस्य तथा अध्यक्ष आश्वासन समिती महाराष्ट्र राज्य.) यांच्या विशेष प्रयत्नाने मा. श्री गोपीनाथ मुंढे चौक, गोल्डन ज्यूबिली शाळा, ते जिजामाता कॉलनी मार्गे फाईन लिव्हिंग , जिंदाल प्राइड, फाईन सफायर या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मा.नामदार श्री रावसाहेब दानवे पाटील. केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री( भारत सरकार) यांचे शुभ हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री राजेशभैय्या टोपे. आरोग्यमंत्री (महाराष्ट्र राज्य),तथा पालकमंत्री (जालना जिल्हा)हे होते.
नगर परिषद, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून जसा जसा निधी उपलब्ध होईल तसा तसा जालना जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे एकवाक्यता असलेले वचन यावेळी श्री रावसाहेब दानवे पाटील, श्री राजेशभैय्या टोपे, आणि श्री कैलाशजी गोरंट्याल यांनी दिले.
मा सौ संगीताताई .(नगराध्यक्षा नगर परिषद जालना) यांच्या कार्यकाळात सिमेंट रस्ता तयार होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जालना जिल्ह्याच्या प्रथम नागरिक सौ संगीताताई गोरंट्याल(नगराध्यक्षा, जालना नगर परिषद), मा.आमदार नारायणरावजी कुचे (बदनापूर विधानसभा मतदार संघ), मा. श्री भास्कररावजी दानवे,(माजी उपनगराध्यक्ष, तथा विद्यमान नगरसेवक प्रभाग क्र 2)
मा.अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ.(अध्यक्ष नगर परिषद जालना.)मा.सौ सय्यद फरहीन अजहर.(सभापती बांधकाम विभाग,नगर परिषद जालना), सौ शितलताई तनपुरे, श्री संजयभाऊ एखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्रीकृष्ण नगर, वसुंधरा नगर, फाईन लिव्हिंग, फाईन सफायर, जिजामाता कॉलनी मधील सन्माननीय नागरिक उपस्थित होते. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून उद्घाटन सोहळा पार पडला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *