ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आजीसमोर नातीवर बलात्कार

March 25, 202112:43 PM 65 0 0

एका व्यक्तीने आजीसमोर नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. यावेळी आजीने संबंधित व्यक्तीला कोणताही विरोध न केल्याने आजीने फूस लावल्यामुळेच हा प्रकार घडला, असा आरोप नातीने केला आहे. याप्रकरणी आजीसह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेख इस्राईल शेख हुसेन (४५, रा. गौसीया कॉलनी) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीचा टाईल्सचा व्यवसाय आहे. पीडित १९ वर्षीय तरुणी मध्यप्रदेश शिवनी येथील रहिवासी आहे. तिच्या आजोबाची बहीण गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाते. ती एका झोपडीत राहात असल्याने तिच्या घराचे काम करायचे होते. त्याकरिता फेब्रुवारीला नागपुरात आली होती. त्यादरम्यान ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता पीडित तरुणी व आजी घरी असताना आरोपी तेथे आला. तो आजीच्या परिचयाचा होता. आजीच्या सांगण्यावरून तो तिच्यावर बळजबरी करू लागला. तिने विरोध केला असता आजीने मदत न करता उलट आरोपीची साथ दिली. तो बलात्कार करून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडिता गावी गेली व कुटुंबीयांना हकिगत सांगितली. याप्रकरणी शिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण गिट्टीखदान पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *