ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बौद्ध उपासक उपासिकांकडून उत्तम प्रतिसाद ; आर्थिक दानासह सर्व प्रकारचे धान्यांचेही दान

February 18, 202114:16 PM 14 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील भिक्खू संघाच्या पहिल्या टप्प्यातील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे.‌ श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली भंते संघरत्न, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलभद्र, धम्मसेवक आप्पाराव नरवाडे, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांच्या उपस्थितीत विविध भागातील गावांना भेटी देऊन दान पारमिता व धम्मदेसनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने आर्थिक दानासह सर्व प्रकारचे धान्य दान व अपत्य दानाबाबतही मार्गदर्शन केले जात‌ आहे.

बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्ह्यात सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांसाठी धम्मसंदेश व धम्मदान यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा प्रारंभ कंधार व तालुक्यातील मौजे कुरुळा येथून झाला होता. त्यानंतर मुदखेड, गायतोंड, तळणी, धानोरा, लिंबगाव, लिंबगाव कँप, वाडी, चिखली, निळा, आलेगाव, आसेगाव, सुनेगाव, हिवरा खु., पिंपरी महिपाल, मरळक, सुगाव, रहाटी, जैतापूर, पिंपरण, नाळेश्वर आदी गावांतून विविध विषयांवरील सामाजिक प्रबोधन करण्यात आले. या यात्रेला अनेक ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका यांचा प्रतिसाद लाभत असून आणखी चार ते पाच टप्प्यांत धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, प्रत्येक गावातून श्रामणेर होऊ इच्छिणाऱ्या उपासकांना दीक्षा देऊन आज १७ फेब्रुवारी पासून खुरगाव येथे विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ते माघ पौर्णिमेपर्यंत चालेल. त्यासाठी नावनोंदणी करण्यात येत आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुरगाव येथे उपस्थित होता येईल असे भदंत पंय्याबोधी थेरो यांनी कळविले आहे. यात्रेदरम्यान आर्थिक दानासह सर्व प्रकारच्या धान्याचे दान भिक्खू संघाकडून स्विकारण्यात येत आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण भवन, विपश्यना केंद्र, भिक्खू निवास यांच्या नियोजित इमारत बांधकामासाठी आर्थिक सहाय्य करावे, बौद्ध कुटुंबांनी आपल्या अपत्यांचेही भिक्खू संघाला दान करावे, प्रत्येक गावातून किमान एका कायमस्वरूपी भिक्खूची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *