ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुरतमध्ये आयोजित जेएनपीए सेझ कॉन्क्लेव्ह ला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद

August 12, 202214:45 PM 18 0 0

उरण (संगिता पवार) : मुंबई, 10 ऑगस्ट, 2022: भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीए ने भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) च्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुरत येथे ‘जेएनपीए सेझ इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022’ चे आयोजन केले होते. या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचा उद्देश्य गुंतवणुकदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या बंदर-आधारित औद्योगिकीकरणाचा एक भाग होण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देणे हा होता. बंदर आधारित अर्थव्यवस्थेस चालना देण्याच्या उद्देशाने जेएनपीएने आपल्या 277.38 हेक्टर फ्रीहोल्ड जमिनीवर बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) प्रकल्प विकसित केला आहे, ज्यामध्ये बंदराच्या जमीन वापर योजनेचा समावेश आहे. हे औद्योगिक केंद्र भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-उत्पादन कार्यरत एसईझेड आहे.

एसईझेडमधील भरपूर संधी आणि विविध वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना जेएनपीएचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले “बंदर-आधारित औद्योगिकीकरणामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करण्याच्या उद्देशाने जेएनपीए एसईझेडच्या या विशिष्ट प्रकल्पासह बंदर आधारित अर्थव्यवस्थते मध्ये आपली क्षमता आणि विकासाच्या पैलूंमध्ये वाढ करत आहे – जे सिंगल-विंडो क्लिअरन्सपासून मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीपर्यंत विविध सुविधा प्रदान करते, ज्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये प्रभावी मार्ग आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होतात. जेएनपीएच्या वतीने, मी सर्व संभाव्य गुंतवणूकदारांना या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी आणि भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो.”

अतिरिक्त आर्थिक क्रियाकलाप, निर्यातीला चालना, गुंतवणुकीला प्रोत्साहन, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास हे जेएनपीए सेझचे उद्दिष्ट आहे. जेएनपीए एसईझेड गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रोत्साहने देत आहे, जसे की आर्थिक कायदे जे देशाच्या इतर सामान्य आर्थिक नियमांपेक्षा अधिक उदार आहेत आणि पाणी आणि वीज पुरवठ्यासाठी अनुदानित दर आहेत. जेएनपीए सेझसाठी पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये रस्ते, वीज, पाणी, स्ट्रॉम वॉटर ड्रेन, सांडपाणी संकलन आणि उपचार आणि घनकचरा विल्हेवाट या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांचा समावेश होतो. जेएनपीए सेझच्या विविध सेक्टरमध्ये प्लॉटच्या सीमेजवळ रस्ता, पाणी, वीज आणि सांडपाण्याची लाईन यासारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. जेएनपीए सेझ मधील भूखंड वाटपासाठी ई-निविदा कम ई-लिलाव प्रक्रिया रबविण्यात आली आहे, ज्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक झाली. आजपर्यंत, ई-निविदा सह लिलाव प्रक्रियेच्या 4 टप्प्यांद्वारे 28 गुंतवणूकदारांना 58 हेक्टरचे भूखंड 60 वर्षांच्या लीजसाठी देण्याचे काम पूर्ण झाले आहे.

कॉन्क्लेव्ह मध्ये ‘जेएनपीए एसईझेड बंदर आधारित औद्योगीकरण: व्यापार करणे सुविधाजनक बनवीणे (ईओडीबीद्वारे) द्वारे संधींचा उपयोग’ या विषयावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली, सदर चर्चेच्या अध्यक्ष स्थानी जेएनपीएचे उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. हे होते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बंदरांचे महत्त्व यावरही या कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा आयोजित करण्यात आली तसेच बी2बी बैठका सुद्धा झाल्या. जेएनपीए सेझची विविध वैशिष्ट्ये दर्शविणारा व्हिडिओ आणि सादरीकरण भागधारक आणि गुंतवणूकदारांसमोर सादर करण्यात आला, त्यानंतर जेएनपीएच्या अध्यक्षांसोबत संवाद सत्र सम्पन्न झाले. या कार्यक्रमाला जेएनपीएचे उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., श्री नितिन बोरवणकर, सीईओ, जेएनपीए एसईझेड उपस्थित होते, तसेच संभाव्य गुंतवणूकदार, उद्योग आणि सरकारी विभागातील वरिष्ठ भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जेएनपीएच्या वित्त विभागाचे प्रमुख श्री. गौतम दास, यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *