ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इन्नर व्हिील क्लब ऑफ जालना हॉरायझनच्या कायदेशीर जनजागृती सप्ताहाला उत्तम प्रतिसाद नेत्रा भक्कड विधी सेवा कार्यालयाचे जेष्ठांना आधार अॅड. अश्विनी धन्नावत

August 25, 202114:52 PM 14 0 0

दिनांक 24.08.2021 रोजी इन्नेर विहील क्लब ऑफ जलना होरिझोन यांच्या मार्फत अध्यक्ष नेत्रा भककड यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर जनजागृती सप्त्याचाया तिसऱ्या दिवशी माहिती देताना अॅड. अश्विनी धन्नावत यांनी सांगितले की आयुष्यभर कष्ट करून स्वतः चे घर खरेदी करणे, मुलांच्या शिक्षण, लग्न इत्यादी कार्यामध्ये जवळ असलेली सर्व जमापुजी खर्च होते व वृध्द काळात स्वतः कडे कोणतीही रक्कम उरत नाही व स्वतःचे घर सुध्दा मुलाच्या नावाने करून दिल्यावर जेव्हा तो मुलगा आई-वडीलांना घराबाहेर काढतो किंवा स्वतःच्या कायदेशीर अधिकार जसे शेजारी त्रास देत असेल त्याच्या विरुध्द तकार किंवा बेकायदेशीर बांधकाम होत असेल त्या विरूध्द कारवाई किंवा स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी न्यायालयीन खटला किंवा प्रकरण दाखल करावे लागते. 

अशावेळी जर जेष्ठ नागरीकाकडे न्यायालयीन प्रकरणासाठी वकील लावण्याकरीता व प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे नसले किंवा आर्थिक सोय झाली नसली तर त्या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वकील सहाय्य मिळण्यासाठी जेष्ठ नागरीक अर्ज करू शकतात व कार्यालयामार्फत त्यांना मोफत विधी सहाय्य दिले जाते. अशी माहीती अॅड. अश्विनी महेश धन्नावत यांनी इन्नरव्हिल क्लब ऑफ जालना हॉरायझन अंतर्गत जेष्ठ नागरीक कायदा जनजागृती सप्ताह अंतर्गत केले. सदर सप्ताह हा इन्नर व्हिील क्लब ऑफ जालना हॉरायझनच्या फेसबूक पेजवर सुरू आहे.

इन्नर व्हिील क्लब ऑफ जालना हॉरायझनच्या कायदेशीर जनजागृती सप्ताहाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल अध्यक्ष नेत्रा भक्कड, सचिव श्रेया गिलडा व टिम यांनी सांगितले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *