ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महान शिवोपासक- महाराणी अहिल्याबाई होळकर

September 5, 202117:29 PM 47 0 0

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रभावीपणे 28 वर्षे इंदूर राज्यकारभाराची धुरा सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर या भगवान शिवाच्या परम भक्त होत्या. जणु त्यांच्या प्रत्येक कार्यात शिवाच्या उपासनेमुळे एक सकारात्मकता निर्माण झाली होती. भगवंताची शक्ती सतत कार्य करत असते ही त्यांची श्रद्धा होती व त्या भावनेतूनच त्या सतत शिवाची पिंड आपल्या सोबत ठेवत असत आपल्याला त्यांच्या प्रत्येक छायाचित्रात त्यांच्या हातात शिवपिंड बघायला मिळते. स्त्रियांच्या कार्यासाठी प्रतिकूल असणाऱ्या काळात एक अत्यंत प्रभावशाली प्रशासक म्हणून त्यांनी कार्य केले. शिवाच्या आराधनेने जनतेचे आचरण योग्य होईल या भावनेतून त्यांनी शिवमंदिरे बांधली अनेक जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाई होळकर यांनी सन 1777 चाली संपूर्ण विश्वात प्रसिद्ध अशा काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.

प्रजेला सुख सुविधा मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी नदीकिनारी अनेक घाट बांधले, अनेक धर्मशाळा ही बांधल्या. उपासनेतून जी चैतन्य शक्ती मिळते ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडते तो प्रभाव कणखरपणा आपल्याला अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वात बघायला मिळतो. प्रत्येक निर्णय घेताना त्या प्रजेचे, सुख महिलांचा आदर डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घ्यायच्या.चातुर्याने ही त्यांनी लढाया जिंकल्या होत्या त्याच्येच एक उदाहरण म्हणजे राघोबा पेशवे इंदूर वर स्वारी करणार हे कळल्यावर त्यांनी अतिशय परखड भाषेत धूर्तपणे त्यांना पत्र लिहिले माझ्याशी लढताना तुम्ही जिंकलात तर स्त्रीशी लढून कोणता पुरुषार्थ दाखवणार आहात जर तुम्ही या युद्धात हरलात तर स्त्री कडून पराजित झाल्यामुळे तुम्हाला जगाला तोंड दाखविता येणार नाही. त्यांच्या या धूर्त व परखड उत्तराने राघोबादादा पेशवे यांनी इंदूरवरची स्वारी रहित केली. अहिल्याबाई होळकर ह्या एक महान शासकच नाहीतर पराक्रमी योध्या होत्या, मावळ प्रांताच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी स्त्रियांना सन्मानाचे आयुष्य मिळण्यासाठी व त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले. विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीतील अधिकार मिळावा व त्यांना मूल दत्तक घेता यावे यासाठी त्यांनी त्या काळच्या कायद्यात बदल केला होता. गरिबांना व भुकेल्यांना अन्न मिळावे म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी अन्नछत्रे उघडली, पाणपोया सुरू केल्या. त्यांच्या शीव भक्तीबद्दल असे म्हटले जाते की त्या राजाज्ञा देताना स्वाक्षरी करताना शिवाचे नाव लिहित असत तेव्हा पासून इंदूर येथे ज्या राजांनी सत्ता सांभाळली त्या प्रत्येकाची राजाज्ञा भगवान शिवाच्या नावानेच निघत राहिली. अश्या शिवभक्तीने प्रेरित प्रत्येकाचा आदर करणाऱ्या व स्त्रिया, विधवा स्त्रिया व गरजवंतांना साठी धावून येणार्‍या कुशल प्रशासक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः प्रणाम.

डॉ० प्रणिता महाजन,
संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *