जालना : शहरातील बहुचर्चीत व गेल्या 20 वर्षापासुन रखडुन पडलेल्या महात्मा फुले मार्केट इमारत बांधकामासाठी राज्य् शासनाकडुन हिरवा कंदिल दाखविण्यात आला असुन जालना नगर पालिकेने स्वत: कर्ज काढुन किंवा आराखडा तयार करुन लिलाव पध्दतीचा अवलंब करत इमारत बांधकाम हाती घ्यावे असे दोन प्रस्ताव राज्य् शासनातर्फे देण्यात आले असल्याची माहिती आ.श्री कैलास गोरंट्याल यांनी आज दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना आ. गोरंट्यालय म्हणाले की, दिनांक 08 ऑक्टोंबर 2020 रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेश टोपे यांच्या मुंबई येथील मंत्रालयातील दालनात महात्मा फुले मार्केट सह जालना न.प. हद्दीतील विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस नगर विकास राज्यमंत्री श्री. प्राजक्त् तनपुरे यांच्यासह आ. कैलास गोरंट्याल, नगर विकास खात्याचे सहसचिव पा.जो.जाधव, जालन्याचे उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, मजीप्रा चे अधिक्षक अभियंता अजयसिंह, जालना येथील जिल्हा प्रशासन अधिकारी राहुल सुर्यवंशी, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, मजीप्रा चे कार्यकारी अभियंता गजाना रबडे, नगर अभियंता राजेश बगळे, सय्य्द सऊद यांची उपस्थिती होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर राज्यशासनाने देखील जालना येथील महात्मा फुले मार्केट इमारत बांधकामासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सदर इमारत जालना नगर पालिकेने कर्ज घेऊन बांधावी किंवा आराखडा तयार करुन स्पॉटवर लिलाव करुन लिलावाच्या माध्यमातुन मिळणार्या रक्कमेतुन इमारत बांधकाम करावी असे दोन प्रस्ताव राज्यशासना तर्फे देण्यात आल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. या मार्केट मधील जुन्या गाळे धारकांना पुन्हा गाळे मिळावे अशी भुमिका आपण पुर्वीपासुनच घेतलेली आहे. या मार्केटची जुनी इमारत पाडतेवेळी जे गाळे धारक होते त्यांना राज्यशासन आणि नगर पालिका निर्धारीत रक्कम निश्चित करुन गाळे देण्यासाठी प्राधान्य देणार असुन सदर रक्कम देण्याची तयारी असलेल्या गाळे धारकांना प्राधान्याने गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुर्वीचे जे गाळे धारक सदर रक्कम देण्यास असमर्थ ठरतील अशा गाळ्यांची निर्धारीत करण्यात आलेल्या रक्कमे पासुन पुढे लिलाव करुन इच्छुकांना गाळे उपलब्ध करुन देण्यात असल्याचे आ. गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. जालना नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे दोन्ही प्रस्ताव मांडण्यात येणार असुन सभेच्या मंजुरी नंतर राज्य शासनाला सदर दोन्ही प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतिष पंच, दिपक भुरेवाल, राम सावंत, नगर सेवक रमेश गौरक्षक, रहिम अन्सारी, गणेश चौधरी आदिंची उपस्थिती होती.
व्यापार्यांकडुन आ. गोरंट्याल यांचे स्वागत
जालना शहरातील महात्मा फुले मार्केटच्या इमारतीचा प्रश्न् गेल्या 20 वर्षापासुन रखडुन पडला होता. हा प्रश्न् मार्गी लावण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी सातत्याने राज्य् शासनाकडे पाठपुरवा केला. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असुन राज्यशासनाने इमारत बांधकामसाठी हिरवा कंदील दाखवल्या नंतर शहरातील व्यापार्यांनी आनंद व्यक्त् केला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. सतिष पंच, सुखदेव बजाज, विजयकुमार गेही, राजकुमार कुकडेजा, अर्जुन बजाज, नारायणदास थारानी, कमलेश कवरानी, अनिलभाई जोशी, पवन धनकानी, विजय गेही, नंदलाल तलरेजा, सोनी कवरानी, बुर्हान भाई, मनोहर गेही, राऊफ भाई, लक्ष्मणीकांत कवरानी, नारायणदास कवरानी आदि व्यापार्यांनी आ. कैलास गोरंट्याल यांची त्यांच्या निवासस्थानी आज बुधवारी दुपारी भेट घेऊन शुभेच्छा देऊन स्वागत करुन अभिनंदन केले.
Leave a Reply